Nashik

दिंडोरीत ताडी विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

दिंडोरीत ताडी विक्री करणाऱ्या तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

सुनिल घुमरे नाशिक

नाशिक : दिंडोरी पोलीस स्टेशनच्या वतीने अवैध दारू विक्री, ताडी विक्री करणाऱ्यावर धडक कारवाई सुरू असून दिंडोरी शहरात आज ताडी विक्री करणारे तिघेजण मुद्देमाल सह ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
दिंडोरी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिंडोरी पोलीस स्टेशन हद्दीत दिंडोरी गावात आश्रय लॉज च्या शेजारी एका पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी प्रवीण राजाराम गंभीररावपेठे (३८) गोपाळ पार्क दिंडोरी, राकेश तुकाराम मेश्राम (४०) शिवाजी नगर दिंडोरी , सचिन खंडेराव जाधव (४१) दिंडोरी हे तिघेही अवैधरित्या बेकायदेशीर आंबट उग्र वासाची ताडी नावाची दारू विक्री करण्याच्या उद्देशानेविनापरवाना बेकायदेशीरपणे चोरट्या रितीने अन्न पदार्थाची भेसळ करुन सार्वजनिक व्यक्तींच्या जिवीतास व आरोग्यास धोका निर्माण होईल असे कृत्य करून स्वतःचे कब्ज्यात बाळगतांना व विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आले.याबाबत कारवाई करून एकूण 50,150/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून तसेच सध्या कोरोना विषाणु संदर्भात महाराष्ट्र शासन तसेच जिल्हाधिकारी नाशिक यांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी, अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकान बंदी, दारु विक्री बंदी असतांना सदर आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण, उपनिरीक्षक कौटे,पो.हवालदार संजय गायकवाड, महेश कुमावत,युवराज चव्हाण,प्रसाद सहाणे यांनी केली.

दिंडोरी शहरात अवैधरित्या ताडी विक्री करणार्यांवर छापा टाकून कारवाई करतांना दिंडोरी पोलीस स्टेशनचे पथक

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button