Bollywood

Bollywood: “त्या” दृष्यांच्या शूटिंग नंतर 37 वर्षांनी अभिनेत्री मंदाकिनी यांनी केला धक्कादायक खुलासा..!

Bollywood: “त्या” दृष्यांच्या शूटिंग नंतर 37 वर्षांनी अभिनेत्री मंदाकिनी यांनी केला धक्कादायक खुलासा..!

बॉलिवूड 90 च्या दशकातील अभिनेत्री मंदाकिनी तिच्या पहिल्या चित्रपट राम तेरी गंगा मैलीमधील तिच्या बोल्ड दृश्यांसाठी ओळखली जाते. हा चित्रपट 1985 मध्ये रिलीज झाला आणि त्यानंतर मंदाकिनीचे करिअर चमकू लागले. राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील दोन दृश्यांमधून मंदाकिनीने सर्वाधिक चर्चेत आणले. एक सीन होता ज्यात ती पांढरी साडी नेसून धबधब्याखाली आंघोळ करताना दाखवली होती. दुसऱ्या सीनमध्ये ती मुलाला स्तनपान करताना दाखवण्यात आली होती. या दोन्ही सीनमध्ये मंदाकिनीला तिच्या बॉडी पार्टमुळे खूप टीकेला सामोरे जावे लागले होते.

या टीकेवर मंदाकिनीने 2023 मध्ये 37 वर्षांनंतर मौन तोडले आणि म्हणाली, सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की, हा ब्रेस्टफीडिंग सीन नव्हता, तो अशा पद्धतीने दाखवण्यात आला होता की, मी स्तनपान करत आहे. तो कसा शूट झाला हे मी सांगायला सुरुवात केली तर लांबलचक चर्चा होईल. सीनमध्ये तुम्ही पाहिलेला क्लीवेज जास्त वाटत होता पण ते तंत्रज्ञानाच्या मदतीने शूट करण्यात आले होते. आजकालच्या अंग प्रदर्शन तुलनेत ते काहीच नव्हते. त्या दिवसांत आम्ही याबद्दल बोललोही नाही. हे सर्व दृश्य शुद्ध होते, आजकाल तुम्ही सर्व जण पाहतच आहात की किती मोठ्या प्रमाणात बोल्ड सीन्स दिले जातात.

या चित्रपटानंतर मंदाकिनीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण नंतर अचानक तिने फिल्म इंडस्ट्री सोडली. 1996 मध्ये आलेला ‘जोरदार’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर मंदाकिनीने डॉ. रिनपोचे ठाकूर यांच्याशी लग्न केले आणि बॉलिवूडला अलविदा केला. तिच्या कारकिर्दीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबतचा फोटो व्हायरल झाल्याने मंदाकिनी अधिक वादात सापडली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button