Pandharpur

नगरसेवकाकडून प्रभागाऐवजी स्वतःच्या घराजवळील विकासकामे करण्यातच अधिक रस

नगरसेवकाकडून प्रभागाऐवजी स्वतःच्या घराजवळील विकासकामे करण्यातच अधिक रस
इतर भागातील कामाकडे दुर्लक्ष केल्याचा फटका बसतोय मात्र पार्टी नेत्यांना
पार्टीच्या नेत्यांना मात्र नाहकपणे जावे लागत आहे नागरिकांच्या रोषाला सामोरे

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरातील नगरसेवक निवडणुकीत प्रभाग पद्धत होती. ज्यावेळी निवडणुकीत प्रचार केला जात होता, त्यावेळी मोठया छातीठोकपणे सर्व जनतेची सेवा करेन,सर्व भागातील मूलभूत गरजा पूर्ण करेन अशी अस्वासने देऊन निवडणुकीत विजय मिळविला. आपल्या प्रभागाचे नगरसेवक पद आपणाकडे आहे याचा विसर पडून चक्क आपल्या घराभोवतीच सतत विकासकामे करून समाधान मिळविले जात आहे. याचा मोठा फटका मात्र पार्टी नेत्यांना रोषाला सामोरे जाण्यासाठी होताना दिसत आहे. पंढरपूर मध्ये काही बोटावर मोजण्या एवढच नगरसेवक आपल्या प्रभागापेक्षाही दुसऱ्या प्रभागातील कामाकडे लक्ष देऊन विकासकामे मार्गी लावीत पार्टी मजबूत करण्यासाठी सतत झटत असल्याचे दिसून येत आहे.काही नगरसेवक मात्र नागरिकांच्या संपर्कात कमी येऊन आपणाला निवडून दिलेल्या मतदारांचा विसर पडल्यासारखे वागत आहेत. केवळ आपल्या निवास्थानआणि कार्यालय सभोवती परत परत रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, आदी कडे लक्ष दिले जाते, तर काही भागात रस्त्यावर ड्रेनेजमधील पाणी, रस्तावर काटेरी झुडपे, दलदलचे रस्ते, डास वाढून त्या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कधीच या तीन वर्षांत जाऊन न पाहिलेले नगरसेवकही सध्या रुबाबात सोशल मीडियावर आपला कामाचा रुबाब मिरवीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button