Pandharpur

पंढरपूरचे सुप्रसिद्ध डॉ. शीतल के. शहा यांनी दुभंगलेले ओठ आणि टाळू नसलेले लहान बालकांच्या शस्त्रक्रिया आणल्या मोफत

पंढरपूरचे सुप्रसिद्ध डॉ. शीतल के. शहा यांनी दुभंगलेले ओठ आणि टाळू नसलेले लहान बालकांच्या शस्त्रक्रिया आणल्या मोफत

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर अनेक व्यक्तींना जन्मताच काही आजार आणि काही समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातीलच एक प्रकार म्हणजे दुभंगलेले ओठ आणि टाळू नसलेले लहान बालके. ही समस्या बऱ्याच लोकांना त्यांच्या घरातील बालकांना किंवा लहानपणापासून शस्त्रक्रिया न करता आल्यामुळे मोठ्या व्यक्तींना झालेली असते. त्यात काही लोकांकडे पैसे नसल्याकारणाने शस्त्रक्रिया करता येत नाही, तर काही लोकांना माहितीअभावी शस्त्रक्रिया करणे राहून जाते. मात्र आता या गोष्टींचा विचार न करता दुभंगलेले ओठ आणि टाळू नसलेली लहान बालके यांचे शस्त्रक्रिया सहज रित्या आणि पूर्णतः मोफत करण्याचा मानस पंढरपूर येथील डॉ. शीतल के. शहा यांनी घेतला असून मागील वर्षभरात ७० पेक्षाही जास्त बालकांची शस्त्रक्रिया डॉ. शीतल के. शहा यांनी अखिल भारतीय महिला सेवा समाज बेंगलोर यांच्या सहकार्याने पूर्णपणे मोफत केले आहे. ही शस्त्रक्रिया वयानुसार चार टप्प्यांमध्ये करण्यात येत असते. तसेच प्रत्येक शस्त्रक्रिया ही मोफत करण्यात येते.ही शस्त्रक्रिया पुणे येथील डॉ. सागर सतीश जंगम (एम.डी. एस. – मुख व चेहरा शैल्यशास्त्र तज्ञ) व त्यांचे सहकारी आपल्या शैल्यनिपूनतेने डॉ. शीतल के. शहा यांच्या नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल, पंढरपूर येथे कार्य करीत आहेत. ही शस्त्रक्रिया प्रत्येक महिन्याच्या १५ ते २० तारखे मध्ये करण्यात येते.या शस्त्रक्रिये व्यतिरिक्त जबड्याच्या व चेहऱ्याच्या इतर विकारांवर माफक दरात शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेसाठी फक्त पंढरपूर मधूनच नव्हे तर मागील वर्षभरात ७० लोकांनी याचा लाभ सोलापूर, सातारा, उस्मानाबाद आणि असे अनेक आजूबाजूच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घेतला आहे. यात विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर कर्नाटक मधील विजापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील ही काही लाभार्थी आहेत. या योजनेमुळे बऱ्याच गोरगरीब आणि गरजू रुग्णांना याचा भरपूर आणि पूर्णपणे पूर्णतः मोफत फायदा झाला आहे. तरी नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. शीतल के. शहा यांनी असे आवाहन केले आहे की या संधीचा गरजूंनी, गोरगरिबांनी पुरेपूर फायदा घ्यावा. यासाठी गरजूंनी नवजीवन चिल्ड्रन्स हॉस्पिटल, सरगम सिनेमा मागे, सरगम चौक, पंढरपूर. फोन नंबर :- 02186-223488 किंवा मोबाईल क्रमांक :- 8329541401, 9822086691 येथे संपर्क साधावा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button