Pandharpur

पंढरपूर शहर शिवसेना विस्तार कार्यकारिणी जाहीर नवीन चेहर्‍यांना व तरुणांना दिली शिवसेनेने संधी… पंढरपूर कार्याध्यक्षपदी अनिल कसबे तर संघटक पदी गणेश घोडके

पंढरपूर शहर शिवसेना विस्तार कार्यकारिणी जाहीर
नवीन चेहर्‍यांना व तरुणांना दिली शिवसेनेने संधी…
पंढरपूर कार्याध्यक्षपदी अनिल कसबे तर संघटक पदी गणेश घोडके

रफिक आतार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर शहरात शिवसेना वाढीसाठी आज शहर कार्यकारणीचा विस्तार करत नवीन चेहऱ्यांना संधी देऊन पंढरपूर शहरातील प्रत्येक घराघरात शिवसेना पोहोचवण्या साठी तसेच येणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्य घराघरात रुजवण्यासाठी आज मान्यवरांच्या उपस्थितीत विस्तार कार्यकारणी जाहीर करण्यात आली शहराध्यक्ष रवी मुळे यांनी पंढरपूर शहराच्या कार्याध्यक्षपदी सामाजिक कार्य करणारे व विविध पक्षसंघटना मध्ये काम करून आपला ठसा उमटविणारे अनिल कसबे यांची निवड जाहीर केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे हे होते यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक साईनाथ भाऊ अभंगराव, जयवंतराव माने, सिद्धू कोरे, नागेश कदम, विनोद कदम,उपशहर प्रमुख लंकेश बुराडे,काका बुराडे आदि मान्यवर उपस्थित होते.
नूतन पदाधिकारी मध्ये पंढरपूर शिवसेना शहर संघटक पदी गणेश घोडके तर सचिव कैलास लोकरे यांची निवड करण्यात आली प्रसिद्धीप्रमुख अमित गायकवाड व विभाग प्रमुख राघवेंद्र ऐनापुरे यांची निवड करून वरील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शिवबंधन बांधून शिवसेनेचा पंचा घालत त्यांना नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी बोलताना नूतन कार्याध्यक्ष अनिल कसबे म्हणाले की पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचवून शिवसेनेच्या कार्याची माहिती देणार आहे त्याचबरोबर तळागळातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू तसेच शिवसेनेच्या विचारातून पदाला योग्य न्याय देऊ असे मत व्यक्त केले. याप्रसंगी नूतन महिला पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये महिला उपशहर प्रमुख मध्ये सौ.रामेश्वरीताई घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सौ.कल्पनाताई वाघमारे व सौ.दहिहंडे यांनी पक्ष प्रवेश केला कार्यक्रमासाठी पंढरपूर शहर शिवसैनिक महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button