Amalner

Amalner: लायन्स क्लब चे सेवाव्रत उल्लेखनीय व अनुकरणीय:-मंत्री गिरीश महाजन अमलनेरला भव्य लायन्स एक्स्पो चे जल्लोषात स्वागत

लायन्स क्लब चे सेवाव्रत उल्लेखनीय व अनुकरणीय:-मंत्री गिरीश महाजन

अमलनेरला भव्य लायन्स एक्स्पो चे जल्लोषात स्वागत

अमळनेर(प्रतिनिधी):- आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याची जाणीव सर्वांना असणे आवश्यक आहे,माणूस सेवा आणि माणुसकी धर्म याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे राजकारण अल्पकालीन असते मात्र सेवा धर्माचे महत्त्व चिरकाल असते. या पार्श्वभूमीवर लायन्स क्लबचे सेवाव्रत निश्चितपणे उल्लेखनीय अनुकरणीय आहे.लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या दूरदृष्टीतून व सेवाभावी वृत्तीतून सर्व देश मोतीबिंदू त्रास मुक्त करण्याचे मिशन आम्ही सुरू केले आहे.रुग्णांनी त्यांच्या मदतीसाठी मला केव्हाही साद घाला मी शंभर टक्के सकारात्मक प्रतिसाद देईल असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले

लायन्स क्लब आयोजित भव्य एक्सपोचा शानदार उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर लायन्सचे प्रेसिडेंट योगेश मुंदडे, सेक्रेटरी महावीर पहाडे,ट्रेझरर अनिल राईसोनी,प्रोजेक्ट चेअरमन नीरज अग्रवाल, माजी आमदार स्मिता वाघ, डॉ. बी.एस.पाटील,जि.प.सदस्या जयश्री पाटील, क्लबचे ज्येष्ठ सदस्य बजरंगलाल अग्रवाल, ख्यातनाम बिल्डर ओमप्रकाश मुंदडे, दुसरे उपप्रांतपाल गिरीश सिसोदिया,रिजनल चेअरमन सी.ए. जयेश ललवाणी उपस्थित होते.
एक्सपो मध्ये खाद्यपदार्थांचे ४५ तर विविध उद्योजक,व्यावसायिक व संस्थांचे ५० पेक्षा जास्त स्टॉल आहेत. त्यात स्थानिक,राज्य तथा परराज्यातून अनेकांनी सहभाग घेतला आहे.यावेळी आमदार अनिल पाटील यांनी लायन्स क्लब करत असलेल्या सेवा कार्याचे मुक्तकंठाने प्रशंसा केली.यावेळी सी.ए.नीरज अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले.प्रेसिडेंट योगेश मुंदडे यांनी प्रास्ताविक केले.
पहिल्या दिवशी लकी ड्रॉ च्या सोडती काढण्यात आल्या.फॅन्सी ड्रेस सह विविध मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. यशस्वितेसाठी लिओ, लिनेस व लायन्स क्लबचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.अनिल रायसोनी यांनी लायन्स प्रार्थना म्हटली. डिगंबर महाले यांनी सूत्रसंचालन केले तर महावीर पहाडे यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button