Pandharpur

उस्मानाबाद पालकमंत्री यांनी धाराशिव कारखान्याच्या पायलट ऑक्सिजन प्रकल्पाची केली पाहणी

उस्मानाबाद पालकमंत्री यांनी धाराशिव कारखान्याच्या पायलट ऑक्सिजन प्रकल्पाची केली पाहणी
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : सध्या कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे अनेक कोरोना रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याने साखर कारखान्यामध्ये प्रथमच ऑक्सिजनची निर्मिती करणार असल्याने धाराशिव साखर कारखान्यावर उस्मानाबादचे पालकमंत्री महोदय ना.श्री.शंकररावजी गडाख साहेब, खासदार श्री.ओमराजे निंबाळकर साहेब यांनी अंतिम टप्प्यात असलेल्या कामाची पाहणी केली. याभेटी दरम्यान ऑक्सिजन प्रकल्पासंदर्भात श्री. गडाखसाहेब यांनी संपूर्ण माहीती घेऊन चाचणी कार्यान्वित करण्यास सांगितले. वाढत्या ऑक्सिजनच्या मागणीनुसार सगळ्याचे लक्ष धाराशिव साखर कारखान्याच्या पायलट प्रकल्पाकडं लागले असून लवकरच चाचणी यशस्वी करण्याचे कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी बोलताना सांगितले. यावेळी उस्मानाबाद जिल्हाधिकारी श्री. कौस्तुभ
दिवेगावकरसाहेब, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती.रुपाली आवळे मॅडम, निवासी उप जिल्हाधिकारी श्री.शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी कळंब डॉ.श्रीमती.अहिल्या गाठाळ मॅडम, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, तहसिलदार श्री.रोहन शिंदे, मंडळ अधिकारी श्री.देवानंद कांबळे, कारखान्याचे संचालक श्री.भागवत चौगुले, श्री. दिपक आदमिले आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button