Amalner

माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन…

माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन…

अमळनेर कै.सु. आ पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळे येथे ग्रामविकास मंडळ नवलनगर संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, तथा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष, शिक्षण महर्षी माननीय नानासाहेब विजय नवल पाटील यांच्या 5 सप्टेंबर रविवारी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले.

यात दि.3/9/20210रोजी निबंध स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा. व आज दि4/9/2021 रोजी वकृत्व स्पर्धा व हस्ताक्षर स्पर्धा अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक नानासो सूर्यवंशी सर,ज्येष्ठ शिक्षक जे एस.पाटील,यु.बी.पाटील, डी बी पाटील,पवार सर,रुपाली पाटील मॅडम ,जाधव सर, व इतर सर्व शिक्षक बंधू आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button