Nashik

हिंदुवॉं सुर्य महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त आॅनलाइन व्याख्यानमालेस उद्या प्रारंभ

हिंदुवॉं सुर्य महाराणा प्रताप यांच्या जयंती निमित्त आॅनलाइन व्याख्यानमालेस उद्या प्रारंभ

नाशिक : हिंदुवॉं सुर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या ४८१ व्या जयंतीनिमित्त आॅनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दशकपूर्ती वर्षात पदार्पण करणारी ही व्याख्यानमाला ११ जून ते १३ जून दरम्यान सायंकाळी ६:३० वाजता होणार आहे.

पहिल्या व्याखानमालेचे पुष्प माजी सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. बालसिंग राजपूत ‘सायबर क्राईम आणि ज्ञान अज्ञान’ या विषयावर गुंफणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल असतील. १२ जून रोजी मुक्ता दाभोलकर ‘विवेकी पालकत्व’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार दीप्ती राऊत असतील. तर, १३ जून रोजी कारगील योद्धा नायक दीपचंद हे ‘मेरा भारत महान’ या विषयावर बोलणार आहेत. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य तानसेन जगताप असणार आहेत.

आॅनलाइन पद्धतीने होणाऱ्या या व्याख्यानमालेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराणा प्रताप जयंती व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्राचार्य संजीव पवार, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष धर्मा भिमसिंग साळुंखे, तसेच मिलिंद राजपूत, डी आर पाटील, जयदीप राजपूत, भवानसिंग सोलंकी, महेंद्र राजपूत, सुनिल पवार, किरण खाबिया, नितीन गिरासे, जयदीप पवार, दीनेश पाटील, राजेंद्र चौहान, जयप्रकाश गिरासे, रामसिंह बावरी, वीरेंद्र सिंह टिळे, सुनिल परदेशी, बबलूसिंह परदेशी, आदींनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button