Pune

पुण्याच्या गोड येवलें ला आला कडू अनुभव , FDAची कारवाई….

पुण्याच्या गोड  ‘येवलें’ला आला कडू अनुभव , FDAची कारवाई….

पुण्याच्या गोड येवलें ला आला कडू अनुभव , Fdaची कारवाई....

पुणे, प्रतिनिधी
 कमी कालावधीत चहा प्रेमींमध्ये प्रसिद्ध झालेल्या पुण्यातील येवले अमृततुल्य असणाऱ्या चहा विरोधात अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत (FDA) कारवाई करण्यात आली आहे. पुणे आणि उपनगरांमध्ये येवले यांची चहा नसगरिकांमध्ये प्रसिद्ध आहे.परंतु आता या अमृत तुल्य चहा च्या स्वाद आणि आरोग्य हानिकारक पदार्थ असल्याचे दिसून आहेत.
 या चहामध्ये मेलानाईटचा भरपूर प्रमाणात वापर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. ही माहिती मिळाल्यानंतर पुण्यातील अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री इम्रान हवालदार आणि रमाकांत कुलकर्णी यांनी येवला फुड प्रॉडक्ट गोडाऊनमधील विक्रीसाठी पॅकबंद करून ठेवलेला चहा पावडर, साखर, टी मसाला यांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. शिवाय यासंदर्भात प्रेस नोटदेखील जारी करण्यात आली आहे. 
तसंच सुमारे 6 लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. या उत्पादनांवर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अंतर्गत आवश्यक असणारी माहिती छापणं बंधनकारक आहे. पण जप्त केलेल्या पाकिटांवर कोणत्याही प्रकारचे लेबल आढळले नाही. त्यामुळे त्यात नेमका कोणता अन्न पदार्थ आहे, त्यात निश्चित कोणता घटक पदार्थ किती प्रमाणात आहेत याबाबतीची कोणतीही माहिती सर्वसामान्यांना देण्यात आलेली नव्हती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button