Amalner

एकदाना पंढाय लागनात..!एक महिना नंतर बळीराजाला भेटना थोडा दिलासा..

एकदाना पंढाय लागनात..!एक महिना नंतर बळीराजाला भेटना थोडा दिलासा..

अमळनेर आज दुपार नंतर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उकाडा होत होता.तर ऊनही खूप तापलं होत.गेल्या एक महिन्या पासून पावसाने दडी मारली होती पण आज दुपारी पावसाने दमदार हजेरी लावली आणि कुठे तरी बळीराजा सुखावला आहे.अमळनेर तालुक्यात तिबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. संपूर्ण गेला महिना पावसाने दडी मारली होती परिणामी पिकांचे नुकसान होत आहे.श्रावण महिना लागून एक आठवडा झाला आहे पण श्रावण महिन्याची संततधार काही लागली नाही.शेतकरी राजा चिंतेत होता.मात्र आज थोड्या फार प्रमाणात का असेना पण पावसाने हजेरी लावली आहे.

सोमवारी रात्री मघा नक्षत्र लागले. आणि एकदाना पंढाय लागनात हल्ली पंढाय काही नसतात पण जुने लोक पाऊस चांगला पडायला लागला की म्हणत पंढाय लागणात..!यावर्षी खूप कमी वेळा पंढाय लागले…पंढाय म्हणजे धाबे घराला, छताला लावलेले पत्रे ..पूर्वी धाब्याचे घर म्हणजे मातीचे धाबे असत त्यावर खारी म्हणजे पिवळ्या रंगाची माती टाकून ते पाणी पत्र्याने बनविलेल्या एक निमुळता पन्हाळ असायचा.. त्याला अहिराणीत पंढाय असे म्हणतात…पंढाय (पाईप किंवा पाणी निघण्यासाठीचे पत्री पन्हाळ) आज एक महिन्यानंतर पडणाऱ्या पावसाकडे समाधानी दृष्टीने पाहत जेष्ठ मंडळींनी लागनात एकडवना पंढाय असे म्हणत आनंद व्यक्त केला.ग्रामीण भागात आजही पंढाय असतात पूर्वी पत्र्याचे असायचे आता पीव्हीसी पाईप जोडतात. खेड्यापाड्यात पंढाय हा शब्द प्रचलित आहे.पडणाऱ्या पावसाचे पाणी अशा पंढाय मधून वाहू लागले म्हणजे पंढाय लागनात, असा चांगल्या पावसाची वार्ता नातेवाईक, दूरच्या मंडळींना आजही भ्रमणध्वनी, लॅण्डलाईन फोनवरुन दिली जाते. पूर्वी मातीचे धाबे असत. पावसाचे पाणी धाब्यावर, छतावर पडून माती चांगली भिजली व पंढाय वाहण्या योग्य पाऊस झाला म्हणजे शेतातील पिकांची तहान भागली अशी धारणा या मागे होती.

संबंधित लेख

Back to top button