Ahamdanagar

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमदार राजळे यांच्या निवासावर विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन संपन्न

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमदार राजळे यांच्या निवासावर विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन संपन्न

अहमदनगर प्रतिनिधी :सुनील नजन:

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील पाथर्डी शेवगाव मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांच्या सिद्धसावली या बंगल्यावर वंचित बहुजन आघाडी तर्फे मोर्चा नेण्यात आला होता. सदर मोर्चा हा वृद्धेश्वर कारखाना येथून घोषणाबाजी करीत आमदार निवासाकडे निघाला असता पोलीस प्रशासनाने रस्त्यातच पोलिसांच्या गाड्या आडव्या लावून मोर्चा अडवला व मोर्चातील चौघे जणांच्या शिष्टमंडळाने आमदार निवासस्थानी जावून आमदार मोनिका राजळे यांच्याशी चर्चा केली तसेच मागण्यांचे निवेदन सादर केले.

निवेदनाची प्रत हातात पडताच आमदार मोनिका राजळे आजारी असतानाही मोर्चेकर्यांना सामोरे गेल्या व त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सर्व शासकीय कार्यालयावर वचक ठेवण्यात येईल व सर्वसामान्य जनतेची कोणत्याही प्रकारची कामे अडवली जाणार नाहीत याची ग्वाही दिली. वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने मोर्च्याच्या सुरुवातीला आमदार निषेधाच्या घोषणा देण्यात होत्या परंतु शिष्ट मंडळाच्या भेटीनंतर मोर्चेकऱ्यांनी आमदार मोनिका राजळे यांचा जयजयकार केला. या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे महासाचिव प्रा. किसन चव्हाण, अरविंद सोनटक्के, प्यारेलाल शेख, सुनील जाधव, छानराज क्षेत्रे, भोरू म्हस्के यांच्यासह शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील कार्यकर्ते सामील झाले होते.

मोर्च्याला सामोरे जाताना आमदार मोनिका राजळे यांच्या समवेत उपसभापती विष्णुपंत अकोलकर, गोकुळ दौंड, सुरेश बाबर आदी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने शेवगाव विभागाचे जिल्हा पोलीस उपधीक्षक मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि. वसंत पवार, परमेश्वर जावळे, बीट प्रमुख पो.कॉ. तुकाराम तांबे, अमोल कर्डिले, पो.हे.कॉ. रांझने, पो.कॉ. सुपेकर, पो.कॉ. बडे, पो.कॉ. बेरड, गुप्तचर विभगाचे भगवान सानप यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button