Surgana

भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI) सुरगाणा तालुका यांच्या वतीने लाडगाव फाटा येथे विविध प्रश्नांसंदर्भात ४ तास रास्ता रोको आंदोलन

भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI) सुरगाणा तालुका यांच्या वतीने लाडगाव फाटा येथे विविध प्रश्नांसंदर्भात ४ तास रास्ता रोको आंदोलन

सोमवार दिनांक २३ जानेवारी २०२३
सुरगाणा तालुक्यातील लाडगाव फाटा येथे भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ सुरगाणा तालुका कमिटीच्या वतीने विविध प्रश्नांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या समर्थनार्थ तालुक्यातील युवक युवती मोठ्या संख्येने एकत्र आले, तालुक्यातील विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी नाशिक सुरगाणा या महामार्गावर चार तास वाहतूक रोखून धरली होती यामुळे नाशिक व सुरगाणा जाणाऱ्या सर्व वाहनांना कोंडी निर्माण झाली होती. तालुक्यातील विविध रखडलेली कामे तसेच आरोग्य केंद्रातील विविध समस्या या त्वरित सुधाराव्यात तसेच आश्रम शाळेतील साहित्य तालुक्यातील रस्ते, आरोग्य सुविधा यात अँबुलन्स, फिरते आरोग्य पथक, औषधांचा तुटवडा, निवासी वैद्यकीय अधिकारी, लघु पाटबंधारे प्रकल्पांची कामे त्वरित सुरु करने , खराब रस्त्यांची दुरुस्ती करने , २०२२मध्ये उद्घाटन झालेली कामे त्वरित सुरु करने, जलजीवन योजनेच्या कामाची चौकशी करने, बारा तास सलगपणे शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करने, सिगलफेज लाईटचा लपंडाव थांबविणे, तालुक्यात बीएसएनएल टॉवर उभारणे, ड घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या युवकांना हक्काचे घर, हाताला काम मिळवुन देने, विविध विभागातील नोकर भरती त्वरित करने, या अनेक जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी लाडगावं येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, विविध विभागाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार यांनी लेखी आश्वासन देऊन हे आंदोलन थांबवण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष ( DYFI) कॉ.इंद्रजीत गावीत तालुका सेक्रेटरी कॉ. पांडुरंग गायकवाड अधक्ष् कॉ नितीन गावीत उपाध्यक्ष कॉ अशोक धूम कॉ चंद्रकांत वाघेरे , रोहिणी वाघेरे यांनी केले. मेनकाताई पवार , मनीषाताई महाले ,भारती चौधरी
अशोक भोये, संजिवनी चौधरी सरपंच – लाडगाव ,सुशिला हिमतन गायकवाड, कैलाश भोये
पप्पू राऊत,
(सरपंच बुबळी) देवा हाडळ, केदु वाघमारे
सदुभाऊ बागुल (सरपंच चिकाडी) भागवत गायकवाड
प्रविण गावित,मोहन पवार,योगश वाघमारे दिनकर राऊत कैलास गावित कान्हा हिरे बळवंत देशमुख दिनेश भोये.सुनील जाधव.
भास्कर महाले, पंढरीनाथ चौधरी
वसंत कामडी,सोनिराम गांगुर्डे
पुंडलिक भुसारे जगदीश गवळी ‘भागवत गवळी भास्कर बागुल
महिंद्र पीठे तुळशीराम खोटरे लिलाधर चौधरी तसेच विविध गावातील सरपंच उपसरपंच सदस्य , तालुक्यातील युवक युवती व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया
तालुक्यात विविध समस्या आहेत मा तहसीलदार यांनी दिलेल्या लेखी आश्वासनामुळे आम्ही आंदोलन मागे घेतले पंधरा दिवसांमध्ये या समस्या पूर्ण करून देऊ असे आश्वासन दिल्यामुळे उपोषण मागे घेतले आहे पंधरा दिवसात जर ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढील काळामध्ये नाशिककार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button