Amalner

Amalner: अमळनेरकरांवर वाढीव कराचा भार नाही, काटकसरीचे धोरण 186 कोटींचे अंदाजपत्रक

अमळनेरकरांवर वाढीव कराचा भार नाही, काटकसरीचे धोरण 186 कोटींचे अंदाजपत्रक

अमळनेर नगरपरिषदेने सन 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. सन 2022-23 या वर्षासाठी 185,69,39,000/-मात्रचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. अंदाजपत्रकचे ठळक वैशिष्टये म्हणजे कोणत्याही प्रकारची करवाढ नाही. काटकसरीचे धोरण आणि उत्पन्नात वाढ व पाणीपुरवठा योजनेवरील ताण कमी करण्यावर जोर देण्यात आला आहे.

प्रशासक सिमा अहिरे यांच्या अध्यक्षते खाली ही सभा पार पडली. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, लेखापाल चेतन गडकर यांच्यासह सर्व कार्यालयीन, सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. कोणत्याही प्रकारची करवाढ न करता व शहरातील नागरीकांना मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाणार आहे. पाणीपुरवठा योजनेवर पडत असलेला अतिरीक्त ताण व तूट भरून काढण्यासाठी अवैध नळ कनेक्शन शोधून त्यावर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करून नियामाधीन केले जाणार आहेत. तसेच स्टैंड पोष्ट नळ बंद करून त्याऐवजी समुह नळ कनेक्शन देऊन पाण्याचे नियोजन केले जाईल.

प्रशासकिय खर्चात काटकसरीचे धोरण अवलंबविण्याचा प्रयत्न आहे. शहरासाठी महाराष्ट्र राज्य सुर्वण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत अंदाजित 35 कोटी रुपयाचे प्रस्ताव शहरातील नागरिकांना 24/7 पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी व वाढीव भुयारी गटार योजनेसाठी नियोजन करण्यात आलेले आह. तथापी न.पा.मालकीचे व्यापारी संकूलांचे लिलावाद्वारे नियोजन करून उत्पन्नात भरीव वाढ करण्याचे प्रयोजन आहे. नगपरिषदेचे महसुली व भांडवली जमा-खर्चाचे अंदाजपत्रक प्रारंभीक व अंतिम शिल्लके सह अनुक्रमे रक्कम रू. 60,29,77,000/- व 125,39,62,000/- असे एकुण रू. 185,61,39,000/मात्रचे आहे. सदर अंदाजपत्रक रक्कम रु.3,89,02,000/- मात्रने शिल्लकी असून यात रोख स्वरूपात 90,55,000/ व बँकेतील विविध खात्यातील शिल्लक रु. 2,98,47,000/- मात्र दर्शविण्यात आलेली आहे.

तथापी कायद्यातील तरतूद व शासन निर्देशानुसार दुर्बल घटक कल्याण निधी 20,00,000/अपंग कल्याण निधी 20,00,000/महिला व बाल कल्याण विकास 15,00,000 या कल्याणकारी योजनांवर विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. सन 2022-2023 या वर्षांचे अंदाजपत्रक सभेपूढे रक्कम रू.185.69,39,000/-मात्रचे मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. अमळनेकरांमधून या अंदाजपत्रकाचे स्वागत करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button