Nandurbar

तब्बल 22 लाखाचा दोंडाईचा पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखूसह पान मसाला पकडला! चौघांविरुद्ध गुन्हा दाखल..

तब्बल 22 लाखाचा दोंडाईचा पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखूसह पान मसाला पकडला! चौघांविरुद्ध गुन्हा दाखल..

प्रतिनिधी/ असद खाटीक

नंदुरबार येथून धुळ्याकडे प्रतिबंधित असलेल्या पान मसाल्या सह सुगंधित तंबाखू ची वाहतूक होत असल्याची खबर मिळाल्याने पोलीस अधीक्षक चिन्मय पंडितराव यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड यांना तात्काळ नंदुरबार रोडवर सापळा लावायला सांगितल्यानंतर mh. 39.c.9221 क्रमांकाचे वाहन पोलिसांनी अडवलं आणि त्यानंतर तब्बल त्याच्यात निघाला 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर वाहन चालक त्याच्यासोबत असलेल्या व्यक्ती तसेच माल देणारा व माल घेणारा याच्याविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात. पो कॉ 13 92 मोहन सिताराम पाटील यांनी फिर्याद दिल्याने भात 5 गुन्हा रजि नंबर 131, 2020 भादवि कलम 328, 272, 273, 188,34 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 व नियम 2011 चे अन्वये दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची ही कामगिरी फत्ते झाली असुन वाहनासह माल पोलिसांच्या हाती लागला. दोंडाईच्या पोलिसांचीही कामगिरी पाहून दोंडाईचा तील नागरिकांनी चांगलेच पोलिसांचे कौतुक केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button