sawada

गावठी पिस्तोल व जिवंत कारतूसासह खिरोदा येथे नाशिक आयजीच्या पथकाने दोघांना केले जेरबंद!

गावठी पिस्तोल व जिवंत कारतूसासह खिरोदा येथे नाशिक आयजीच्या पथकाने दोघांना केले जेरबंद!

सावदा तालुका रावेर वार्ताहर युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या खिरोदा गावाती चौधरी कोल्ड्रिंग समोर गावठी पिस्तोल व जिवंत कारतूसासह गुप्त माहितीच्या आधारावर नाशिक आयजीच्या पथकाने व सावदा पोलिसांच्या मदतीने सापळा रचून मोठ्या शिताफीने दोन अपराधींना जेरबंद किल्ल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या खिरोदा गावात पाल कडून एम एच २० बी डब्ल्यू ५५२० या दुचाकी वाहनाने येणारे अनिल बद्री कच्छवा रा.पानाचे कुऱ्हे ता.भुसावळ जि.जळगांव व गणपत भिकन शेजुळ रा. अंजनडोह औरंगाबाद हे गावठी पिस्तोल घेऊन खिरोदा गावात येत असल्याची गुप्त माहिती नाशिक आयजीच्या पथकास कळाली असता त्यांनी सावदा पोलिसांच्या मदतीने सापळा रचून मोठ्या शिताफीने चौधरी कोल्ड्रिंग समोर सदरील मोटरसायकलने आलेल्या दोघांची ओळख व खात्री करून घटनास्थळी आधीच दबा धरून बसलेल्या नाशिक पथकातील ए.एस‌.आय बशीर गुलाब तडवी,पोहेडकॉ.रामचंद्र बोरसे यांच्यासह सावदा पोलिस ठाण्याचे एपीआय देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेंद्र पवार,समाधान गायकवाड,पोहेकॉ मनोज हिरोळे संजय चौधरी ममता तडवी यशवंत टहाकळे यांनी वरील दोघांना दि. ७/१/२०२२ रोजी दुपारी २ वा. सुमारास जागीच जेरबंद केले असता त्यांच्याजवळ एक गावठी पिस्तूल व जिवंत कारतूसासह मोटर सायकल व सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल हस्तगत केला आहे.

यानंतर दोघांना ताब्यात घेऊन सावदा पोलिस ठाण्यात आणले असता पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केल्या दरम्यान आकाश बाबासाहेब सिंगारे व अफजल उस्मान शाहा यांनी सामूहिकरित्या १४ वर्षीय माझ्या मुलीवर अत्याचार केलेला असून ते जामिनावर सुटल्याचा राग आल्याने त्यांना जिवंत ठार मारण्याच्या उद्देशाने मी पिस्तूल व जिवंत कारतूस घेऊन जात होता अशी आश्चर्यकारक हकीकत संशयित इसम गणपत भिकन शेजूळ रा.अंजनडोह औरंगाबाद यांनी सांगितली आहे.तरी वेळेवर गुप्त माहिती मिळाल्याने पुढील होणारा मोठा अनर्थ टळला हे मात्र खरे आहे.

तरी सदरील घटनेबाबत ए एस आय बशीर गुलाब तडवी यांनी सावदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आर्म एक्ट नवे कलम २५(३) मुंबई पोलीस अधिनियमचे कलम ३७(१) व महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम १३५ प्रमाणे वरील संशयित दोघाही समाजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button