Nandurbar

गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना महाराष्ट्र पोलीस दे नंदुरबार पोलीसांचा दणका…..

गर्दीच्या ठिकाणी मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना महाराष्ट्र पोलीस दे नंदुरबार पोलीसांचा दणका…..

नंदुरबार/फहिम शेख

26/09/2022 ते दिनांक 05/10/2022 रोजी दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे. नवरौत्सवाच्या अनुषंगाने मंदिर व यात्रौत्सव दरम्यान गर्दीच्या ठिकाणी मुलींची किंवा महिलांची छेड काढण्याचे प्रकार काही टवाळखोर युवकांकडून होत असतात त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुध्द पोलीस ठाणे स्तरावर महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार यांचे एक दामिनी पथक तयार करुन टवाळखोर करणाऱ्या युवकांविरुध्द कारवाई करणेबाबतचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिले होते.
त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार शहर पोलीस ठाणे 14. अक्कलकुल पोलीस ठाणे- 02 व दामिनी पथक – 05 असे एकुण 21 युवकांवर गर्दीच्या ठिकाणी व बाजार पेठांमध्ये टवाळकी करुन मुलींची छेडछाड करणाऱ्या युवकांना संबंधीत पोलीस ठाण्याला आणून सक्त ताकीद देऊन सोडून देण्यात आले आहे.तसेच सदर युवकांनी यापुढे अशा प्रकारचे कृत्य केले तर त्यांच्या पालकांना संबंधीत पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना त्यांच्या पाल्याच्या कृत्याबद्दल समज देऊन त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. तसेच पुन्हा त्या युवकांनी तिसऱ्या वेळेस देखील अशा प्रकारचे कृत्य केले तर त्याचेविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.नवरात्रौत्सवा दरम्यान जिल्हयातील वेगवेगळया सार्वजनिक ठिकाणी गरब्याचे आयोजन केले जात असून त्या ठिकाणी असणाऱ्या टवाळखोर युवकांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आली असून अशा टवाळखोर युवकांविरुध्द कारवाई करणेबाबतचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिलेले आहेत. सदरची मोहिम नवरात्रौत्सवा दरम्यान अजून प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्ये करण्यापासून त्यांना परावृत्त करावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दल व नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. पी. आर. पाटील यांनी सर्व पालकांना केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button