Kalyan

मुरबाड तालुक्यातील मढ आदिवासी आश्रम शाळा नवीन इमारती ची मागणी – बिरसा क्रांती दल

मुरबाड तालुक्यातील मढ आदिवासी आश्रम शाळा नवीन इमारती ची मागणी – बिरसा क्रांती दल

मुरबाड / प्रतिनिधी -रविंद्र आंबवणे

शहापूर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना शासकीय आश्रम शाळा मढ या शाळेसाठी जागा उपलब्ध असून लवकरात लवकर इमारत व्हावी या मागणीसाठी बिरसा क्रांती दल मड तालुका मुरबाड जिल्हा ठाणे यांनी निवेदन दिले.

शासकीय आश्रम शाळा मढ ता मुरबाड जिल्हा ठाणे येथे १ ली ते १० वि पर्यंत मुले शिकत असून मुलांना उन्हाळी व पावसाळी फार त्रास सहन करावा लागत असून वर्ग खोल्यांची दैने अवस्था आहे.तरी २ महिन्यात इमारतीचे काम चालू करावे तरी जागा उपलब्ध असून २०१२ पासून पैसे पडून आहेत.तरीही आमच्या आदिवासी मुलांना १५ वर्षे पोलट्री शेड मध्ये दिवस काढावे लागत आहेत.शाळेची नवीन इमारत व्हावी अशी बिरसा क्रांती दलाची मागणी केली.

त्यावेळी अध्यक्ष तुकाराम विठ्ठल रडे उपाध्यक्ष रविंद्र प्रकाश आंबवणे सचिव तथा विद्यमान सरपंच मधुकर लहू पदीर, सदस्य तानाजी सोमा वरघडा, नारायण जैतु सावळा, धनाजी वाघ, संजय आंबवणे, राम वाघ, काकाजी वाघ, महेश वाघ, दिलिप शिद,छगन वाघ, तुकाराम हिरु वाघ, तातू पादिर आदी नागरीक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button