Kalyan

कल्याण कासरा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असो.च्या अध्यक्ष पदी डाॅ. मनोहर सासे यांची निवड

कल्याण कासरा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असो.च्या अध्यक्ष पदी डाॅ. मनोहर सासे यांची निवड

विनोद जाधव कल्याण

Kalyan : वासिंद येथून जवळच असणाऱ्या कासणे या गावी राजाराम साळवी बंगला येथे कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असो.ची द्वि वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
पुढील द्विवार्षिक कालावधी करिता अनेक संघटनांवर कार्यरत असणारे आणि कार्याध्यक्ष म्हणून काम पाहणारे,कामगार नेते डॉ.मनोहर सासे यांची सर्वानुमते अध्यक्ष या पदी निवड करण्यात आली.
या वेळी संपूर्ण कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून लवकरच या संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार आहोत असे नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी सांगितले.
संघटनेच्या सल्लागार अनिता झोपे,माजी अध्यक्ष जीतेंद्र विशे,प्रसिद्ध प्रमुख शैलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सभा पार पडली.
डॉ.मनोहर सासे यांच्या निवडीने संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. सदर निवड झाल्या बद्दल डॉ.मनोहर सासे यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button