Kalyan

? संतापजनक..भिवंडी हादरली, 38 वर्षीय नाराधमाचा 9 वर्षीच्या चिमुरडीवर बलात्कार..

? संतापजनक..भिवंडी हादरली, 38 वर्षीय नाराधमाचा 9 वर्षीच्या चिमुरडीवर बलात्कार..

भिवंडी, 08 डिसेंबर : महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतांनाच भिवंडीत एका 9 वर्षाच्या चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असता नारपोली पोलिसांनी नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. इम्रान इब्राहिम शेख (वय 38) असे चिमुरडीवर अत्याचार प्रकरणी बेड्या ठोकलेल्या नराधमाचे नाव आहे.

पीडित मुलगी व नराधम एकच इमारतीमध्ये राहत असून नराधम वरच्या मजल्यावर राहतो. पीडित चिमुरडी ही एक वर्षांची असताना तिला आकडी आल्याने तिची बौद्धिक क्षमता कमी असल्याची माहिती पीडितेच्या आईने पोलिसांना दिली.
याच बाबीचा नराधम आरोपीने फायदा उचलून पीडित चिमुरडीला घरात कुणी नसतांना तो राहत असलेल्या पहिल्या माळ्यावर बोलावले व तेथे चिमुरडीबर बळजबरीने अत्याचार केला.

नराधमाच्या अत्याचारामुळे वेदना असाह्य झाल्याने पीडित चिमुरडी घराशेजारीच रडत बसली होती. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या एका महिलेले तिची विचारपूस केली, असता तीने घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर या महिलेनं तिच्या आईला फोनद्वारे नराधम इम्रान शेख याने मुलीवर अत्याचार केल्याची खबर दिली.

आईने घरी धाव घेत मुलीकडे विचारणा केल्यानंतर तिच्यावर घडलेला प्रकार उघड होताच पीडितेच्या आई-वडिलांना धक्काच बसला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात नराधम इम्रान शेख याच्याविरोधात पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नारपोली पोलिसांनी नराधम इम्रान शेख यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button