Mumbai

Mumbai: महाराष्ट्राची मास्क पासून सुटका…मंत्री मंडळात निर्णय..!

Mumbai: महाराष्ट्राची मास्क पासून सुटका…मंत्री मंडळात निर्णय..!

मुंबई गेली दोन वर्ष संपूर्ण जग कोरोनाच्या महाभंयकर संकटाचा सामना करतोय. कोरोना महामारीच्याविरोधात लसीकरण मोहिमही वेगात सुरु आहे. त्याबरोबरच मास्क वापरणं, हात स्वच्छ धुणं या सारख्या नियमांचीही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं जात आहे.

राज्यात गेल्या काही दिवसात कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मास्कपासून सुटका होण्याची शक्यता आहे. आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मास्कसंदर्भात चर्चा करण्यात आली.
मास्कसंदर्भात लवकरच टास्क फोर्सशी चर्चा केली जाणार आहे. टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण जाहीर केलं जाणार आहे. अनेक देशांमध्ये जनता मास्कच्या निर्बंधातून मुक्त झाली आहे.

राज्यात लसीकरण मोहिम
राज्यात लसीकरण मोहिमेवर विशेष भर दिला जात आहे. आतापर्यंत १४ कोटी ६९ लाख ५७ हजार नागरिकांनी लस घेतली आहे. यात ६ कोटी ३ लाख १२ हजार नागरिकांचं संपूर्ण लसीकरण झालं आहे. तर ८ कोटी ५९ लाख लोकांनी पहिला डोस घेतला आहे. राज्यात संपूर्ण लसीकरणानंतर मास्कपासून सुटका होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या देशांत मास्कपासून सुटका
सध्या जगात ब्रिटन, अमेरिका, न्यूझीलंड, हंगेरी या देशांमध्ये मास्कचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button