Latur

तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळेत बालिका दिन उत्साहात संपन्न

तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळेत बालिका दिन उत्साहात संपन्न

तपसे चिंचोली जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती विविध उपक्रमांनी साजरी

प्रशांत नेटके

_दिनांक ३ जानेवारी २०२० रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपसे चिंचोली येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने बालिका दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेची विध्यार्थीनी प्रिया गाडेकर ,प्रमुख पाहुणे म्हणून बालासाहेब हांडे(केंद्रप्रमुख),श्रीमती देशमुख मॅडम(साधनव्यक्ती BRC पंचायत समिती औसा),मोहनराव मोरे(मुख्याध्यापक)हे होते.
शाळेत भाषण स्पर्धा, शैक्षणिक रांगोळी स्पर्धा व कला साहित्याचे प्रदर्शन, बोलता बोलता उपक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी शाळेच्या शिक्षिका संतोषीमाता लोहार यांची मुलाखत इयत्ता सहावी मधील प्रणाली लोखंडे हिने इंग्रजी भाषेतून घेतली.
कार्यक्रमात बालासाहेब हांडे (केंद्रप्रमुख) व शाळेचे सहशिक्षक अशोक पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विध्यार्थीनी शुभांगी लोहारे आणि आभारप्रदर्शन धर्मराज भिसे सरांनी केले.यावेळी शाळेतील शिक्षक प्रदीप इज्जपवार, विलास चव्हाण, सिद्धेश्वर आयरेकर, देवानंद कोंडमगिरे,अनुराधा कनामे,स्वाती बिराजदार (सेविका) व शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button