Latur

हरंगुळ (बु) च्या राजेनगर व विठ्ठलनगर मंध्ये जाण्यासाठी रस्ता आणि पिण्याच्या पाण्याची सोय करा..तहसीलदारांना निवेदन.

हरंगुळ (बु) च्या राजेनगर व विठ्ठलनगर मंध्ये जाण्यासाठी रस्ता आणि पिण्याच्या पाण्याची सोय करा.
– हरंगुळचे माजी सरपंच तथा लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या नेतृत्वाखाली दिले तहसीलदारांना निवेदन.

लातूर :- लातूर शहरालगत असलेल्या हरंगुळ (बु.) येथील राजेनगर आणि विठ्ठलनगर या भागातील नागरिकांसाठी नगरातील वस्तीत जाण्यासाठी रस्ता व पिण्याच्या पाण्याची तात्काळ सोय करावी, यासाठी लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी आज १७ एप्रिल २०२३ रोजी प्रभारी तहसीलदार राजेश जाधव यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
हरंगुळ (बु.) भागातून कळंब रोड गेलेला आहे. या दिशेलाच गट नं. ८४ व अन्य गट नंबर मंध्ये राजेनगर व विठ्ठलनगर या लोकवस्त्या आहेत. मात्र येथील नागरिकांना त्यांच्या घराकडे जाण्यासाठी रस्ताच नाही. नावीलाजाने ते रेल्वे पटरीपासून वाहतूक करत असतात. त्यामुळे त्यांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या लोकवस्तीतील लोकांना पर्यायी व हक्काचा रस्ता करून देण्यात यावा. तसेच या भागात पाण्याची बोअर आहे मात्र विज कनेक्शन नसल्याने पाण्याअभावी नागरिकांची हेळसांड होत आहे. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि नाकर्तेपणामुळे या भागातील नागरिकांची होणारी हेळसांड थांबवावी व सोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी तहसीलदारांकडे आज केली आहे.
यावेळी शंभर ते दिडशे महिला पुरुष नागरिक उपस्थित होते. तहसीलदारांना भेटणार्‍या शिष्टमंडळात लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे, संतोष पनाळे, मुरलीधर गवळी, किशोर बनसोेडे, शौकत देशमुख,चून्नु शर्मा, सुधाकर गोरे, अप्पाराव घाडगे, रामलिंग डोंगरे, भानुदास सरवदे, रवीप्रताप वर्मा, माणिक श्रीमंगले, सय्यद शिराजुद्दीन आशिया देशमुख, प्रवीण देशमुख, राजाबाबू राजपूत, अजहर देशमुख, गोवासिंग राजपूत, लक्ष्मण गायकवाड, पूजा राजपूत, नेपालसिंग राजपूत, दिलीप जाधव, महादेव कापसे, व्यंकट भिसे, राजाबाबू राजपूत, उमाकांत बुरांडे, शिवकुमार गुप्ता, सिंधूबाई कुलकर्णी, आरती आळणे, रुपाली कदम, सविताबाई धुमाळे, शालुबाई कोळी, कलावतीबाई आंधळे, कौशाबाई शितोळे, संगीता कांगणे, ज्योती स्वामी, कोंडाबाई शंकाफुले, शहादा देशमुख, वनिता गायकवाड, सुरेखा घाडगे, सरलाबी शेख, सकीनावी शेख, प्रभावती कोळी, गीताबाई राजपूत, रामकली राजपूत, हजारीबाई राजपूत, आशाबाई शर्मा, गायत्री उपळे, रंजना पारवे, शीला बोराडे, मन्नाबी शेख, शकुंतला कांबळे, राजश्री गवळी, जाहेदाबी शेख, अर्चना शिंदे, मकतुमबी सय्यद, रुक्मिणी कदम, सुषमा कोळी, निकिता शिंदे, महानंदा स्वामी यांच्यासह अनेकांचा समावेश होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button