Jalgaon

खासदार उन्मेश पाटील, महापौर ना. सीमाताई भोळे यांच्या उपस्थितीत खड्डे डागडुजीचा शुभारंभ.

खासदार उन्मेश पाटील, महापौर ना. सीमाताई भोळे यांच्या उपस्थितीत खड्डे डागडुजीचा शुभारंभ.
जळगाव शहरात अग्रवाल हॉस्पिटल तर ग्रामीण मध्ये पिंपळकोठे येथे दुरुस्तीचा शुभारंभ
खासदार पाटील यांनी घेतली ठेकेदारांची झाडाझडती

मनोज भोसले
जळगाव — जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावर पाऊसा मुळे जागोजागी खड्डे पडले असून त्यांची तातडीने दुरुस्ती व्हावी. यासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी भक्कम पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने आज या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून एम. जे.कॉलेज चौफुली येथून आज दि.६, बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजता शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर ना. सीमाताई भोळे, स्थायी समितीचे सभापती अड. सुचीताताई हाडा (सभापती स्थायी समिती मनपा जळगाव), सौ. शोभाताई बारी (सभापती महिला व बालकल्याण समिती मनपा जळगाव), अतुल भाऊ हाडा, नगरसेवक पिंटू दादा काळे, कुलभूषण भाऊ पाटील, मयूर कापसे, अतुलभाऊ बारी, शफी भाई, पालकमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद भाऊ देशमुख,गिरीश ब्रहा टे, स्वामी पाटील,सन्माननीय सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, तसेच अधिकारी सिन्हा साहेब यांचे उपस्थित करण्यात आला आहे.

जळगाव ग्रामीण रस्त्यावर देखील कामाचा शुभारंभ

पिंपळ कोठे(एरंडोल) येथे जळगांव धुळे रस्ताच्या दुरुस्तीचा सायंकाळी साडेसहा वाजता शुभारंभ करतांना खासदार उन्मेश दादा पाटील, भाजपचे नेते तालुकाध्यक्ष एस आर पाटील, राष्ट्रीय महामार्ग चे सिन्हा साहेब, सरपंच बडगुजर, यांच्या सह ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी कामाच्या दिरंगाई बाबत ठेकेदारांची खासदार उन्मेश पाटील झाडाझडती घेतली. उद्यापासून रात्रंदिवस काम झाले पाहिजे अन्यथा जनते सोबत मी देखील आपणांस काळे फासेल अशी तंबी खासदार यांना दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button