Chopda

चोपडा भाजपाचे दूध दर वाढीसाठी महा एल्गार रस्तारोको आंदोलन

चोपडा भाजपाचे दूध दर वाढीसाठी महा एल्गार रस्तारोको आंदोलन

लतीश जैन

चोपडा
महाविकास आघाडी सरकारने दुधउत्पादकांसह राज्यातील सर्वच शेतक-यांना वाऱ्यावर सोडल्याने या झोपलेल्या आघाडी सरकरला जागे करण्या साठी आज सकाळी 10 वाजता भारतीय जनता पार्टी महायुती तर्फे चोपडा येथे यावल रोड वरील पंकज स्टॉपवर पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष व पं स सभापती आत्माराम म्हाळके, जेष्ठ नेते तिलक शहा ,तालुका अध्यक्ष पंकज पाटील शहर अध्यक्ष तथा नगरसेवक गजेंद्र जैसवाल यांचे नेतृत्वा खाली दुधाचे टेंकर व वाहन अडवून रास्तारोको करण्यात आला.

या वेळी गाईच्या दुधाला सरसकट रु. 10/-प्रतिलीटर, व दुधपावडरला प्रति किलो रु.50/- ,दुधखरेदी दर प्रति लीटर रु.30/- करण्यात यावा* या प्रमुख मागणी सह शेतकऱ्यांचा मागील वर्षाचा पडून राहिलेला कापूस हमी भावाने पूर्णपणे खरेदी करावा, यूरिया सह तत्सम रासायनिक खतांचा मुबलक पुरवठा ही वेळेत झालाच पाहिजे, टाळेबंदितील शेतकऱ्यांचे शेतीचे व सर्वसामान्यांचे घरगुती लाईटबील माफ करावे, सर्व गाळे धारकांचे आकारलेले गाळ्याचे भाडे पूर्णपणे माफ करावे, केंद्रा कडून प्राप्त रेशनिग माल वितरकांकडून हा नागरिकांना पूर्णपणे वितरित न होतां त्यातील होणाऱ्या गडबडीची चौकशी व्हावी आणि मका केंद्रातहीं झालेल्या घोटाळ्यांची चौकशी व्हावी या दोन्हीही ठिकाणी दोषींवर कठोर अशी कार्यवाही व्हावी या महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन चोपडा तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले.

सदर आंदोलन अतिशय शांततेत व शिस्तीत सुरू असतांना या रस्ता रोकोत अडकलेल्या सिरीयस रुग्णाचे वाहनास आंदोलन कर्त्यांनी तात्काळ मार्ग मोकळा करून दिला.
या आंदोलनात विधान सभाक्षेत्र प्रमुख प्रदीप पाटील जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील , जिल्हापरिषद सदस्य गजेंद्र सोनवणे, तालुका , कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक धनंजय पाटील, तापीसह सूतगिरणी संचालिका सौ. रंजना नेवे ,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश ल पाटील, शहराध्यक्ष तुषार पाठक, भाजपा उपाध्यक्ष देविदास पाटील, विठ्ठल पाटील, विठ्ठल वाघ, प्रवीण चौधरी, लक्ष्मण माळी, गोपाल पाटील , कोषाध्यक्ष धीरज सुराणा सरचिटणीस हनुमंत महाजन, मनोहर बडगुजर, सुनील सोनगिरे, चिटणीस जिल्हा संवाद संयोजक प्रमुख भरत सोनगिरे, व्यापारी आघाडी अध्यक्ष हेमंत जोहरी, ओबीसी सेल अध्यक्ष सुरेश चौधरी, प्रवीण चौधरी, पं स उपसभापती भूषण भिल, भाजपा प्रसिद्धी प्रमुख यशवंत जडे,सोशल मीडिया पेमुख योगेश बडगुजर, कार्यालय मंत्री मोहित भावे , जेष्ठ कार्यकर्ते पत्रकार अनिल पालिवाल , लक्ष्मण पाटील मुन्ना शर्मा जे डी सोनार , बी एस महाजन, विजय बाविस्कर, धर्मदास पाटील,कमलेश मराठे या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या असून निवेदन सादर करताना आंदोलनात शेकडोच्या संखेने लाऊन व सोशल डिस्टनसिंग ठेऊन भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते.

या आंदोलनाचे वेळी चोपडा शहर ग्रामीण पोलिस स्टेशन पीआय मनोजपवार व संदीप ठेंगे यांचे मार्गदर्शना खाली पोलीस कर्मचार्यानी चोख बंदोबस्त ठेवला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button