Pandharpur

फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फॅबटेक पब्लिक स्कूल मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती साजरीप्रतिनिधी
रफिक अत्तारफॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ यांनी स्वराज्याचा रक्षक जन्माला घातला बालपणीच स्वराज्य रक्षणाचे बाळकडू पाजून छत्रपतींना सक्षम करणाऱ्या राजमाता जिजाऊचे अतुल्य योगदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही, तसेच स्वामी विवेकानंदांच्या भाषणामुळे भारताचे वेदांत, अमेरिका आणि युरोपच्या प्रत्येक देशात पोहोचले असे युवकांचे प्रेरणास्थान वेदांत प्रख्यात प्रभावी अध्यात्मीक शिक्षक स्वामी विवेकानंदांची जयंती प्रशालेत साजरी करण्यात आली. प्रशालेचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शाळेचे शिक्षक श्री निसार इनामदार, श्री सतीश देवमारे, सौ.वनिता बाबर, सौ शितल बिडवे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button