Dondaicha

? Crime Diary..मीलमधील तांदुळाचे कट्टे चोरी प्रकरणात, संशयीत म्हणून आज मार्केट मधून उचललेल्या मोहन सदाशिव मराठे याचा पीरबल्ली शहादा रस्त्याजवळ बेवारस अवस्थेत डेडबाॅडी मिळाल्या प्रकरणी गावात खळबळ…..

मीलमधील तांदुळाचे कट्टे चोरी प्रकरणात, संशयीत म्हणून आज मार्केट मधून उचललेल्या मोहन सदाशिव मराठे याचा पीरबल्ली शहादा रस्त्याजवळ बेवारस अवस्थेत डेडबाॅडी मिळाल्या प्रकरणी गावात खळबळ…..

मयत मोहन मराठेची आत्महत्या बाबत नातेवाईकांना संशय…

असद खाटीक

दोंडाईचा -येथे नुकतेच ऑईलमील मध्ये तांदुळाचे कट्टे चोरी प्रकरणी दोंडाईचा पोलीसांनी अगोदर तीन आरोपी ताब्यात घेतले होते. त्याअनुषगांने पोलीसांनी आज पुढील तपासात नाव समोर आल्यावर मार्केटमध्ये हमालीचे काम करत असलेल्या मोहन सदाशिव मराठे{३६} रा. संत कबीरदास नगर यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र त्याचे शव शहादा रस्त्यावरील पीरबल्ली जवळ संशरीरित्या मिळून आल्याने गावात खळबळ निर्माण झाली. मयताचे नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात दोन तास प्रेत आणण्यास उशीर झाल्याने व मृत्यू बाबत संशय निर्माण झाल्याने प्रेत ताब्यात घेणार नाही अशा इशारा देत इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची अट धरली व याबाबत रात्री उशिरापर्यंत खबर घेण्यात आली.

यावेळी उपजिल्हा रुग्णालयात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल माने, शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पीआय श्री दुर्गेश तिवारी, शिरपुरचे पीआय श्री हेमंत पाटील, अप्पर तहसीलदार श्री सुदाम महाजन, दोंडाईचा पोलीस स्टेशनचे एपीआय श्री पंजाबराव राठोड, एपीआय श्री संतोष लोले, पीएस आय श्री देविदास पाटील, त्यानंतर घटनेची तात्काळ दखल घेत एखाद तासातच दोंडाईचा पोलीस ठाण्यात मा. पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडीतसाहेब,अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत, एलसीबीचे पी आय श्री शिवाजी बुधवंत आदी जिल्ह्य़ातील अधिकारी वर्गाने परिस्थिती शांततेत हाताळली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button