Dondaicha

मोहन मराठेचा मृत्यु दोंडाईचातील योगेश धनगर खून प्रकरणाची पुनरावृत्ती तर नाही ना !- मराठा क्रांती मोर्चा धुळेचा पोलीस प्रशासनास सवाल

मोहन मराठेचा मृत्यु दोंडाईचातील योगेश धनगर खून प्रकरणाची पुनरावृत्ती तर नाही ना !- मराठा क्रांती मोर्चा धुळेचा पोलीस प्रशासनास सवाल

मयताचे शवविच्छेदन इनकॅमेरा करत,मॅजिस्ट्रेट पंचनामा व सीसीटीव्ही फुटेज जमा करण्याची मागणी. ….

असद खाटीक

दोंडाईचा येथे दिनांक सात ऑक्टोबर बुधवार रोजी नुकत्याच घडलेल्या ऑईलमीलमधील तांदुळाचे कट्टे चोरी प्रकरणात संशयित म्हणून बाजार पेठेत हमाली काम करणारा मोहन सदाशिव मराठे(३८) ह्या युवकाला दुपारी दोन वाजता स्थानिक तपास अधिकारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले, तद्नंतर त्याच्या घरच्यांना माहिती मिळाल्यावर मयताचे आईने सायंकाळी पाच वाजता पोलीस स्टेशन गाठले व माझा मुलगा कुठे आहे, त्याला आपण का घेऊन आले, त्याने कोणता गुन्हा केला आहे, मला त्याला भेटू द्या अशी मागणी केली. परंतु पोलिसांनी त्याच्या आईला उडवा उडवीची उत्तरे देऊन परत पाठवले. तेथून मयत झालेल्याची आई पोलीस स्टेशन जवळच चैनीरोडवर राहत असलेले समाजाचे नेते व माजी नगरसेवक श्री विजूभाऊ मराठे यांच्याकडे निर्दोष असलेल्या आपल्या मुलाला पोलीसांनी सोडावेची गुहार लावण्यासाठी गेली. यावेळी विजूभांऊनी होकार देत, सहा वाजेला सायंकाळी पोलीस स्टेशन गाठले. त्यांनीही मोहन मराठे यास भेटण्याची विनंती केली. पण त्यांचीही भेट होऊ दिली नाही. मोहन मराठे यास मेडिकलसाठी घेऊन गेले आहेत, असे सांगण्यात आले. तुम्ही नंतर या. तरी विजूभांऊनी एपीआय राठोड यांना प्रत्यक्ष भेटत, विनवणी करत सांगितले की, साहेब मोहन निर्दोष असेल अन्याय करू नका व दोषी असेल तर आम्ही तुम्हाला सोडायचे सांगणार नाही. म्हणून आपण चौकशीत गरिबाला न्याय द्यावा असे सांगितले. नंतर सायंकाळी सात वाजता, त्या युवकाचा मृत देह दोंडाईचा शहादा रस्त्यावर मध्यभागी पडलेला काही युवकांना दिसला. त्यामुळे त्या युवकांनी त्या मृतदेहाला रस्त्याच्या कडेला उचलून ठेवले व सदर घटनेची माहिती दोंडाईचा पोलिसांना सात वाजता जमलेल्या नागरिकांनी दिली. परंतु पोलीस सात वाजेपासून दोन तास उशिराने म्हणजे रात्री नऊ वाजेपर्यंत घटना स्थळी पोहचले. पाच मिनिटाच्या अंतरासाठी पोलिसांना पोहचायला तब्बल दोन तास का लागतात. यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावरून मोहन मराठे ह्या तरुणाचा घातपात झाल्या असल्याचा दाट संशय निर्माण झाला आहे. कारण दोंडाईचा पोलीस स्टेशनची पार्श्वभूमी याबाबत अगोदर खराब आहे. म्हणून सखोल चौकशी करावी अशी मागणी प्रत्यक्ष भेटीतून धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ मोरे यांनी मोर्चाच्या समनव्यकाना घेऊन पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित साहेब,मा. अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हा सिव्हिलचे सिव्हील सर्जन श्री सांगडे साहेब यांच्याकडे केली.

तसेच सिव्हील सर्जन यांनी शवविच्छेदन करण्याची घाई करू नये. शव विच्छेदन इन कॅमेरा करावा, ह्यासाठी प्रशासनाकडे मागनी केली आहे.त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी साहेब यांच्या भेटीत सर्व घटना क्रम सांगितला . त्यांनी सदर माहिती जिल्हाधिकारी साहेबांना कळविली आहे. त्यानंतर अधिक माहिती साठी व पोलीस प्रशासनाला सविस्तर व वस्तुस्थिती माहिती प्राप्त व्हावी म्हणून पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित ह्यांच्या भेटीत, साहेबानी वस्तुस्थिती व सर्व घटना क्रम जाणून घेतला. त्यावरून साहेबांनी शिष्ठ मंडळाला सांगितले की, मी ही पहिल्या दिवशी घटना स्थळी जाऊन आलो आहे. मला मिळाली माहिती व आपल्या कडील माहिती बरोबर आहे. ह्या घटनेची निःपक्षपाती चौकशी करण्यात येईल. पोलीस का लेट पोहचले. मयतास ताब्यात घेतले का नाही? ह्याची सखोल चौकशी केली जाईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. गुन्हे गार कोणीही असो त्याची गय केली जाणार नाही.

शिष्ठ मंडळाच्या मागणी प्रमाणे शवविच्छेदन इनकॅमेरा करने, मॅजिस्ट्रेट पंचनामा करावा, पोलिसांचा पंचनामा ग्राह्य धरु नये. दोंडाईचा पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही रेकॉर्ड जमा करावे. त्यामुळे सदर घटनेवर प्रकाश पडू शकतो,मयत मोहन मराठेला पोलीस स्टेशनला किती वाजेला आणले व पोलीस स्टेशनमधून मयत बाहेर किती वाजेला पडला. ज्या वेळेस तो पोलीस स्टेशन मधून बाहेर पडला, त्यावेळेस त्याची अवस्था काय होती? जिवंत अथवा मृत यासाठी सीसीटीव्ही फुटेज महत्वाचा दुवा ठरतील, अज्ञात इसमा विरुद्ध आयपीसी 302 चा गुन्हा दाखल करावा. ह्या सर्व मागण्या शिष्ठमंडळाच्यावतिने साहेबांना सांगितल्या व मयत मोहन मराठेच्या परिवारास योग्य न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समनव्यक यांनी शवविच्छेदना च्या ठिकाणी जाऊन. मयत मोहन मराठे ह्याच्या नातेवाईक भाऊ, मामा यांची भेट घेतली व मराठा क्रांती मोर्चा आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.न्याय मिळून देण्यासाठी सर्वतोपरी लढा देऊ.परिवाराने हिम्मत धरावी. यावेळी डॉ. संजय पाटील , श्री राजेंद्रभाऊ इंगळे, श्री नानासाहेब कदम, श्री मुन्नाआप्पा शितोळे, श्री प्रदीपभाऊसाहेब जाधव,श्री आबा कदम,श्री. रजनीश निंबाळकरसर,श्री वीरेंद्र मोरे,श्री प्रदीप जाधव,श्री रवींद्र शिंदे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button