Kalyan

मनसे प्रभाग क्र. 16 आयोजित जनधन व पॅनकार्ड शिबीरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद..

मनसे प्रभाग क्र. 16 आयोजित जनधन व पॅनकार्ड शिबीरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद..

कल्याण पी व्ही आंनद

महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे प्रभाग क्रमांक 16 येथे योगी धाम परिसरातील धडाडीचे महाराष्ट्रसैनिक मोटू भाई जाधव यांच्या 15 ऑक्टोबर या वाढदिवसानिमित्त… उपविभाग प्रमुख श्रीकांत प्रभू,शाखा अध्यक्ष दिलीप दादा गायकवाड, माजी शाखा अध्यक्ष सतिश मोरे, सुनिल ऊतेकर यांच्या प्रमुख नेतृत्वात विभागातील जनतेच्या सोयीसाठी जनधन झिरो बॅलन्स खाते व पॅनकार्ड शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला माजी आमदार मा.प्रकाश भोईर, जिल्हा प्रमुख मा.उल्हास भोईर,कल्याण शहर प्रमुख मा. कौस्तुभ देसाई, राज्य सचिव सौ उर्मिला तांबे,वासंती जाधव जिल्हा सचिव, महिला कल्याण शहर प्रमुख सौ शितल विखनकर,राजन शितोळे, माजी नगरसेविका सौ लक्ष्मी बोरकर, श्री व सौ अशोक जाधव, सचिन पोपलाईट, रोहन आक्केवार, , अविना केणे, अर्चना चिंदरकर, विजय पवार, दुष्यंत नाईक, संदीप म्हात्रे, शैलेश भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरवात मनसे चे या विभागातील संस्थापक, माजी शाखा अध्यक्ष कै. विजय ऊतेकर यांची कन्या कुमारी श्रद्धा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
ज्या नागरिकांनी या अगोदर काही कारणास्तव या योजने अंतर्गत झिरो बॅलन्स खाते उघडले नव्हते त्यांनी प्रभाग क्रमांक 16 येथिल योगी धाम परिसरातील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात रविवार या सुट्टीच्या दिवशी, आपल्या घराशेजारीच, प्रभागात प्रथमतःच आयोजित केलेल्या झिरो बॅलन्स योजना व पॅनकार्ड शिबिराचा लाभ घेतला. एकूण 412 नागरीकांनी याचा लाभ घेतला. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, कोरोना संचारबंदीचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता. हा कार्यक्रम आवश्यक असेल तेव्हा पुन्हा राबविण्यात येईल असे जाहीर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्रसैनिक पंकज डोईफोडे,शेखर अटोले,वासुदेव परब, मोटू जाधव, चंदन ठाकूर,चैतन्य मोरे, ईश्वर राठोड, सुजय प्रभू,कैलाश शिरसाट, सिद्धेश दळवी, सौरभ राऊळ, यांनी विशेष मेहनत घेतली..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button