Amalner

Amalner: युवारंग महोत्सवात निर्भय आणि जयेश सोनारने वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेत पटकावले रौप्यपदक..!

Amalner: युवारंग महोत्सवात निर्भय आणि जयेश सोनारने वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेत पटकावले रौप्यपदक..!

फैजपूर येथे संपन्न झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आयोजित युवारंग महोत्सवात अमळनेर प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार याने वक्तृत्व व वादविवाद या दोन्ही स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून रौप्यपदक जिंकले वादविवाद स्पर्धेत अमोल पाटील त्याचा पार्टनर होता.

इंस्टालेशन या ललित कला प्रकारात जयेश संजय सोनार, अमोल पाटील, प्रिया परदेशी, संजना महाजन या सहकारीनी रौप्यपदक प्राप्त केले.

जयेश व निर्भय धनंजय सोनार यांच्या या यशाबद्दल प्राचार्य एम एस वाघ, प्रा. नितीन पाटील, प्रा डॉ रमेश माने, प्रा डॉ लीलाधर पाटील प्रा डॉ संदीप नेरकर, डॉ जी एम पाटील इ नी अभिनंदन केले असून तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातून देखील अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button