Ahamdanagar

मिरी-तिसगाव रस्त्याच्या कामाची क्वालिटी कंट्रोल विभागामार्फतच चौकशी करणार आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा आठतास विज देणारः राज्यमंत्री ना.प्राजक्तदादा तनपुरे

मिरी-तिसगाव रस्त्याच्या कामाची क्वालिटी कंट्रोल विभागामार्फतच चौकशी करणार आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा आठतास विज देणारः राज्यमंत्री ना.प्राजक्तदादा तनपुरे

सुनील नजन

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव-मीरी या रस्त्याच्या कामाची क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत तपासणी करून शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा आठतास विज उपलब्ध करून देणार असल्याची माहिती नगरविकास व उर्जा राज्य मंत्री ना.प्राजक्तदादा तनपुरे यांनी दिली. ते पाथर्डी तालुक्यातील कडगाव ते जोडमोहोज या १७लाख ७१हजार रकमेच्या दोन कि.मी. रस्त्याच्या कामाच्या शुभारंभा प्रसंगी बोलत होते.ना. तनपुरे पुढे म्हणाले की क्रुषीविषयक उर्जा धोरण विधिमंडळात मंजूर होणार आहे.सरकार खाजगी जमिनीवरही विजप्रकल्प सुरु करणार आहे.शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे. प्रारंभी कडगाव येथील काकडे वस्तीवर रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन ना.तनपुरे यांच्या हस्ते झाले. नंतर गावात जाहीर सभेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे,जिल्हा परिषद सदस्य अनिलराव कराळे,दत्तू कोरडे,छबुराव कोरडे,सुदाम गीते,भारत वांढेकर,भागिनाथ गवळी,सुभाष गवळी,अशोक शिरसाट, ठेकेदार एन.टी. खेडेकर,अभियंता सय्यद साहेब, डेप्युटी इंजिनिअर कजबे साहेब, ग्रामसेवक नारायण नजन,अशोक कदम,वसंत वाघमारे,आसाराम खेडेकर ई.मांन्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button