Amarawati

राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याला केला 700 रु दंड

राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याला केला 700 रु दंड

अमरावती

राज्यमंत्री नामदार बच्चू कडू यांच्या स्वागताला पुष्पगुच्छ देणे अधिकाऱ्यांच्या अंगलट आले असून त्या पोटी आता ७०० रुपयांचा दंड संबंधित अधिकाऱ्याला भरावा लागणार आहे.

२०१३ साली आघाडी सरकार च्या काळात कुठल्याही शासकीय कार्यक्रमात, पुष्पहार, पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ देण्यात येऊ नये असे परिपत्रक काढण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी कुठेही होत नव्हती.

कार्यक्रम म्हटला की पुष्पगुच्छ हार वै चे नियोजन केले जाते एवढेच नव्हे तर स्वागत केले नाही तर राग रुसवा केला जातो.मात्र याला अपवाद ठरत आता शालेय शिक्षण, जलसंपदा, कामगार राज्य मंत्री नामदार बच्चू कडू यांनी 2013 च्या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी केली आहे.

ही घटना आहे अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार पंचायत समिती अंतर्गत क्रीडा स्पर्धा उदघाटन प्रसंगातील.या कार्यक्रमात कडू यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणाऱ्या अधिकाऱ्या विरुद्ध हे पाऊल उचलले आहे.

या कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी कार्यक्रमाचे आयोजक होते त्यांनी पुष्पगुच्छ देऊन ना बच्चू कडू यांचे स्वागत केले परंतु त्यांनी यासाठी ७०० रुपये दंड द्यावा व त्या रकमेतून वह्या पुस्तक खरेदी करून गरजू विद्यार्थ्यांना द्याव्यात अशी सूचना राज्यमंत्री कडू यांनी केली.

या मुळे खऱ्या अर्थाने 2013 च्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणी आता ना.बच्चू यांनी स्वागत समारंभातून हार तुरे हद्दपार करण्याची केली आहे आणि इतर आमदार खासदार यांनीही यापासून थोडे शिकावे स्वतःचे स्वागत करू न देता शासन निर्णय याचे पालन करावे असे जनतेला वाटू लागले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button