रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने तहसील कार्यालय पातूर येथे महाविकास आघाडी सरकार विरोधात भव्य निदर्शने
प्रतिनिधी विलास धोंगडे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट प्रणीत रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद जिल्हासंघटक आकाश हिवराळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार साहेब व ठाणेदार साहेब ह्यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्य मंत्री यांना निवेदन देण्यात आले.फुले शाहू आंबेडकर ह्यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात लॉकडाउन च्या दरम्यान बौद्ध समाजावरील अन्याय अत्याचाराच्या घटनेमध्ये भयंकर वाढ होत आहे.बौद्ध समाजाचे तरुण अरविंद बनसोड व विराज जगताप यांच्या भरदिवसा हत्या करण्यात आल्या.व 7 जुलै रोजी ज्या महामानवाने या देशाला पवित्र असे संविधान दिले त्या संविधानाच्या भरवश्यावर हा अख्खा भारत देश चालत आहे त्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी बांधलेल्या राजगृह जिथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी ते राजगृह पुस्तका साठी समर्पित केले आहे त्याच राजगृहावर दगडफेक करून नासधूस करण्यात आली आहे.आशा समाजकंटकावर योग्य ती कार्यवाही करून फाशीची शिक्षा देण्यात यावी.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्याचे निवास्थान म्हणजे राजगृह या बंगल्याला झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी व या ऐतिहासिक वस्तूची जपणूक करून सदर आरोपीची सी आय डी चौकशी करण्यात यावी व अशा प्रकारच्या कुठल्याही घटना महाराष्ट्रात ह्यासमोर घडल्या तर त्याला महाविकास आघाडी सरकार सर्वस्व जबाबदारी राहील व दलित व बौद्धावरील अन्याय अत्याचार ह्यापुढे कदापि सहन करण्यात येणार नाही.असा इशारा देण्यात आला ह्यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे,कार्यकर्ते सागर इंगळे,अण्णा पोहरे,हरीश गुडधे,शुभम धाडसे,सुमेध पोहरे,सोनू किरतकार,बंटी किरतकार,पवन तांबे,संतोष उपर्वट,रुपेश अवचार,विलास वाहोकार,छोटू अवचार,निखिल सहस्त्रबुद्धे,सम्राट तायडे,आकाश सोनोने,बंटी अवचार,छोटू शिंदे,राम पुरुषोत्तम, कुणाल चावरे, गौरव सरदार,कुणाल हिवराळे,श्याम कराळे, अनिकेत कांबळे,राजेश डोंगरे आदींसह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






