sawada

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या माथेफिरूवर गुन्हा दाखल व्हावा – शहर शिवसेनेची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या माथेफिरूवर गुन्हा दाखल व्हावा – शहर शिवसेनेची मागणी

“तसेच कर्नाटक राज्याची बुद्धिहीन मुख्यमंत्र्यांचा देखील जाहीर निषेध करण्यात आला.”

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथील शहर शिवसेनेच्या वतीने नुकतेच सावदा पोलिस स्टेशनात देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बंगरुळ (कर्नाटक राज्य) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या माथेफिरूला तात्काळ गुन्हा दाखल होऊन अटक करावी. तसेच सदरील घटनेला शिल्लक म्हणून संबोधणारे कर्नाटक राज्यचे मुख्यमंत्री कडून छत्रपती शिवाजी महाराजा बाबत अनादर झाल्याने संपूर्ण जगातील शिवाजी महाराज प्रेमी सह शिवसेनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून या बुद्धिहीन मुख्यमंत्र्याचा जाहीर निषेध होणे फार गरजेचे होते.महणून यांच्या देखील जाहीर निषेध व्यक्त करून सावदा येथील शहर शिवसेनाचे पदाधिकाऱ्यांनी सावदा पोलीस स्टेशनात एपीआय देविदास इंगोले यांच्याकडे निवदन सादर केले आहेत.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख भरत नेहते, सुरजसिंग परदेशी, उर्फ (बद्री), माजी नगरसेवक शामकांत पाटील,तालुका उपप्रमुख धनंजय चौधरी,शहर संघटक शरद भारंबे,मनीष भंगाळे,गणेश माळी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button