Amalner: कळमसरे येथे आरोग्य शिबिर संपन्न..! 200 रुग्णांची तपासणी..!
अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे सिद्धिविनायक हॉस्पिटल अंतरिक्ष दातांचा दवाखाना अमळनेर तसेच व कळमसरे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. हे शिबिर गावातील गणपती हॉस्पिटलमध्ये पार पडले. यात 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन येथील गणपती रुग्णालयाचे संचालक डॉ. भूषण पाटील व डॉ. शुभांगी पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच जगदीश निकम, उपसरपंच पिंटू राजपूत, डॉ. सतीश सोनवणे, मुरलीधर चौधरी, रामचंद्र पाटील, योगेंद्र राजपूत, सी.एस.पाटील,प्रभाकर
माळी आदी उपस्थित होते. शिबिरात हृदयरोग, डायबेटीस, दमा, टीबी, थायरॉईड व दनतरुग्ण अशा आजारांवर हे शिबिर आयोजित केले गेले होते.
यावेळी सुमारे 200 रुग्णाची तपासणी केली गेली. अमळनेर शहरातील नामांकित हृदयरोग तज्ञ डॉ. विजय धनगर व दंत चिकित्सक डॉ. शुभम झाबक यांनी उपस्थित रुग्णाची तपासणी करून योग्य मार्गदर्शन करण्यात येऊन ठराविक रुग्णांना औषधी देखील मोफत वाटप केली गेली. सूत्र संचलन आशिष छाजेड यांनी केले, डॉ भूषण पाटील यांनी आभार मानले.






