Maharashtra

म.न.पा.रंगभूमी सन्मान तर्फे “एकपात्री अभिनय स्पर्धा ” संपन्न …!

म.न.पा.रंगभूमी सन्मान तर्फे “एकपात्री अभिनय स्पर्धा ” संपन्न …!

राहुल खरात

महानगर पालिका रंगभूमी आयोजीत दिवंगत सुनिल कदम स्मरणार्थ एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन आणि सांगता सोहळा रविवार दिनांक १० नोव्हेबर रोजी म न पा शाळा, भवानी शंकर रोड , कबुतर खाना, दादर (प) येथे प्रमुख मान्यवर अतिथी प्रसिद्ध सिने -नाट्य कलावंत सुरेश डाळे – पाटील , दिग्दर्शक -पत्रकार महेश्वर तेटांबे , डॉ.किशोर खुशाले, तसेचआदी मान्यवर कलावंतांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी अनेक कलाकारांनी एकपात्री अभिनय स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला त्यात प्रामुख्याने
भावना रहाटे (प्रथम क्रमांक), सचिन भिलारे (द्वितीय क्रमांक) आणि सखी गुंडये
(तृतीय क्रमांक) तसेच काही उत्तेजनार्थ
(उत्तेजनार्थ १) विराज सावंत
(उत्तेजनार्थ २) डॉ अनुराधा कान्हेरे, तसेच परिक्षकांचा वतीने विशेष निवड म्हणून सायली गावंड, दिपीका गोलिपकर
यांना प्रमुख मान्यवर व प्रसिद्ध नेपथ्यकार श्री संदेश बेंद्रे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यांत आली. या सर्व एकपात्री स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री श्रीमती अनुपमा ताकमोगे आणि श्री.अमित राय यांनी पाहिले.हा संपुर्ण एकपात्री अभिनय स्पर्धा सोहळा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी संदेश जाधव,सुनील जाधव,सुधीर पाटणकर, विजय जाधव, मिलिंद कांबळे यांनी परिश्रम घेतले स्पर्धेसाठी श्री सहदेव मोहिते (प्र.का.अधिकारी) श्री.हरिष जामठे (सह.प्र का अधिकारी ) यांचे मार्गदर्शन लाभले श्री.वैशंपायन गमरे यांनी उपस्थित स्पर्धक , सन्मा.परीक्षक आणि सन्मा. अतिथी यांचे आभार मानून या सोहळ्याची सांगता करण्यात आली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button