Baramati

महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नकलेश भोसले यांची निवड

महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नकलेश भोसले यांची निवड

प्रतिनिधी – आनंद काळे

बारामती – महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी श्री नकलेश भोसले यांची तर उपाध्यक्षपदी श्री शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. यांच्या निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेचे सहसचिव श्री उपदेश भोसले यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेच्या सर्व जिल्ह्यामध्ये पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे.कर्मचारी संघटनेमध्ये सर्व सुशिक्षित व नोकरदार वर्ग असल्याने पारधी समाज्यातील अनेक नोकरदाराचे प्रश्न,बेरोजगार तरुणाचे प्रश्न,समाज्यामध्ये हाल अपेष्टा मध्ये जीवन जगणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कटिबद्ध राहील असे मनोगत महाराष्ट्र राज्य आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेचे सहसचिव श्री उपदेश भोसले यांनी केले.

पुणे जिल्ह्या कार्यकारणी मध्ये श्री गणेश शिंदे (सरचिटणीस),श्री शशिकांत शिंदे(कोषाध्यक्ष),श्री राहुल भोसले(कार्याध्यक्ष),श्री नटवर शिंदे(संघटनप्रमुख),श्री सुरेश काळे (प्रसिद्धिप्रमुख) व श्री राजू चव्हाण(सल्लागार) यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button