Ahamdanagar

शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी गद्दार वाघाच्या मुसक्या आवळल्या?

शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी गद्दार वाघाच्या मुसक्या आवळल्या?

(सुनिल नजन/ अहमदनगर जिल्हा)

इतिहासात बखरकारांनी लिहुन ठेवलेल्या सुभाषितांची पुनरावृत्ती अहमदनगर जिल्ह्यात प्रत्यक्ष अनुभवयास मिळाली. “वाघाच्या जबड्यात, घालून हात,मोजित दात,ही जात मराठ्यांची” असे एक सुभाषित आहे. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख स्वर्गीय अनिलराव कराळे यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे येथील गावातील वस्तीवर शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी गद्दार वाघाच्या मुसक्या आवळून रंगेहाथ पकडले आणि वण अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. आडगाव, जवखेडे खालसा,कासार पिंपळगाव, कोपरे, हनुमान टाकळी,वडुले, वाघोली,चितळी, पाडळी शिवारात धुमाकूळ घालीत या बिबट्याने अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांना आपली शिकार बनवले होते.शेतीत काम करणाऱ्या शेतमजूरांना, शेतमालकांना शेतात जाताना त्रास देत पंचक्रोशीत आपली दहशत निर्माण केली होती.अनेक शेतकरी वैतागून गेले होते.कामत शिंगवे गावातील अनेक शेतकरी एकत्र येऊन त्यांनी बीबट्याला जेरबंद करण्यासाठी योजना आखली. शेतात लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या होत्या. कुठे ही बीबट्याची चाहूल लागली तरी सर्व माहिती एकमेकांना मोबाईल वरुन दिली जात होती. स्वर्गीय अनिलराव कराळे यांचे चुलत बंधू अशोकराव कराळे यांच्या शेतात बीबट्याला पकडण्यासाठी विहिरी भोवताली लोखंडी जाळे लावण्यात आले होते. तो वाघ पाणी पिण्यासाठी विहिरी जवळ येत असल्याचे अनेकांनी पाहिले होते.एका शेतकऱ्यांने बीबट्याला कपाशीच्या शेतात झोपलेल्या अवस्थेत पाहिले आणि सर्व शिवसैनिकांना खबर देण्यात आली.सर्वानी बीबट्याला हुसकावून लावत जाळीच्या दिशेने दामटून लावले आणि बीबट्याचे जाळीत मुंडके अडकून अनेक प्राण्यांची शिकार करणारा शिकारीच खुद्द शिकार झाला. मग शेतकऱ्यांनी त्याचे चारही पाय बांधून कोलदांडा घातला आणि वन अधिकारी व कर्मचारी वांढेकर यांना पाचारण करून त्यांच्या ताब्यात बिबट्याला देऊन सर्व शिवसैनिक शेतकऱ्यानी सुटकेचा निश्वास टाकला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button