Faijpur

नाहाटा महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

नाहाटा महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

फैजपूर(प्रतिनिधी सलीम पिंजारी तालुका यावल

-भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्य विद्याशाखेचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी गोस्वामी सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. आर. एस. नाडेकर यांनी केले.लोकमान्य टिळक यांच्या कार्याविषयी व त्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन आपण करावयास हवे असे प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. प्रतिभा गलवाडे यांनी ‘भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक’ यांच्या जीवनाविषयी काही प्रसंग मांडले. आपण निर्भर,निडर बनायला शिकले पाहिजे. आपली जबाबदारी आपण ओळखली पाहिजे असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
तसेच प्रा.डॉ. विठ्ठल केंद्रे यांनी ‘प्रतिभावंत साहित्यिक :अण्णाभाऊ साठे ’ याविषयावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य व साहित्या विषयी माहिती दिली. एकप्रतिभावंत साहित्यिक म्हणून त्यांची ओळख असल्याचे सांगितले.’माकडीचा माळ’ या कादंबरी लेखनानंतर त्यांना अन्यायाला सामोरे जावे लागले.बालपणापासून त्यांना पोवाडे लेखनाची प्रेरणा मिळाली. त्यांनी विविध जाती धर्मावर लेखन केले.तमाशाला नवीन नाव लोकनाट्य हे मिळवून दिले. साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव आपल्या मनोगतात मांडला. अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी. गोस्वामी यांनी त्यांच्या आदर्शाचे पालन करण्यास सांगितले. समाजात स्वातंत्र्य, समता,बंधुता कशी नांदेल यासाठी आटोकात प्रयत्न या महापुरुषांनी केल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेतील प्रफुल्ल वाघमारे, गंगा ढाके यांनी मनोगत व्यक्त केले. निखील ससाणे,नीरज सावकारे, लीना वारके या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बऱ्हाटे, प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.मानसी वाघ तर आभार प्रा.डॉ.दिनानाथ पाठक यांनी मानले. कार्यक्रमास मराठी विभागातील विभागप्रमुख प्रा. डॉ. जे. एफ पाटील, प्रा. डॉ. के.के. अहिरे, डॉ.राजेंद्र तायडे, प्रा.पुरुषोत्तम महाजन, प्रा.गौतम भालेराव डॉ. स्वाती महाजन, प्रा. वंदना महाजन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास अर्थशास्त्र विभागातील प्रा.डॉ. एस.टी. धूम, प्रा.डॉ. किरण वारके, प्रा. डॉ. पी.ए. अहिरे, प्रा. डॉ. डी. एम.टेकाडे, प्रा.डॉ.प्रफुल्ल इंगोले, डॉ. मनोज पाटील,प्रा. साहेबराव राठोड, डॉ.सचिन राजपूत, प्रा.श्रीपाद वाणी, डॉ. ममताबेन पाटील, प्रा.अक्षरा साबळे, प्रा.शितल सोनवणे, प्रा.शिवानी माळी, प्रा. शलाका निकम, प्रा. कविता पांडव उपस्थित होत्या. मानव विद्याशाखेतील बहुसंख्य प्राध्यापक आणि विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button