Amalner

निम येथे विधी सेवा समितीचा कार्यक्रम संपन्न…

निम येथे विधी सेवा समितीचा कार्यक्रम संपन्न…

अमळनेर येथील निम या गावात विधी सेवा समितीचा कार्यक्रम संपन्न झाला.आर एम कराडे वरिष्ट दिवाणी न्यायाधीश यांच्या सह सोबत सरकारी वकील के आर बागुल , आर बी चौधरी आर व्ही निकम तसेच संभाजी पाटील , विवेक चौधरी ,सूर्यवंशी वकील, गावातील सरपंच भगवान भिल ग्रामसेवक यांनी कार्यक्रम आयोजित केला. त्यात वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश करडे यांनी तुमचे अधिकार काय या बाबत माहिती दिली तर के आर बागुल वकील यांनी वृद्ध व्यक्ती ज्यांना मुलं वागवीत नाही त्यांना काय अधिकार आणि मिळणार खावटी व प्रॉपर्टी बाबत चे अधिकार यावर मार्गदर्शन केले.तसेच निकम वकिलांनी वहिवाट कायद्याच्या तरतुदी वर मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम विठ्ठल मंदिर परिसरात पार पडला.ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button