Rawer

रस्ता आहे का तलाव लोहारा ते सावखेडा रस्त्याची दयनीय अवस्था रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य..

रस्ता आहे का तलाव लोहारा ते सावखेडा रस्त्याची दयनीय अवस्था रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य..


प्रतिनिधी : मुबारक तडवी


रावेर : रावेर तालुक्यातील लोहारा ते सावखेडा रस्त्याचे गेल्या 2 / 3 वर्षापासुन बारा वाजलेले असुन संपुर्ण रस्त्यांमध्ये मोठ मोठे खड्डे पडून जागोजागी पाणी साचल्याने जणू तलावाचे स्वरुप आले आहे व हा रस्ता अपघातास कारणीभुत ठरत आहे.रहदारीसयातनामय परिस्थिती निर्माण झाली आहे रस्त्याच्या मोठमोठ्या खड्यांमधे फैजपुर इरिगेशन चे एअर सिमेंट पाईप जागोजागी लिकेज असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आणि हेच पाणी शेतकऱ्यांच्या ,मजुरांच्या रहदारीला खुप मोठा अडथळा निर्माण करीत असल्यामुळे, वाहने चालविणे तल सोडाच पण पायी चालण्यासही तारेवरची कसरत करावी लागते प्रसंगी आपले जीव धोक्यात घालुन शेतकरी,मजुरांना यानाइलास्तव वाहनधारकांना या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे,कारण या रस्त्याने मार्गक्रमण नेमका कुठूुन करायचा? कारण रस्त्यात खड्डे का तलावात रस्ता हेच न उमगानाशे झाले आहे,वेळोवेळी या रस्त्याबाबतीत काही शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकत्यांनी या शेतकरी रस्त्यांबाबतीत निवेदने देऊन देखील,विविध वृत्तपत्रामधे बातम्या प्रकाशित करुन देखील काहीही उपयोग होत नसल्याने परिसरातील शेतकरी व मजुरांमधे संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांबाबतीत नाराजी व्यक्त केली जात आहे. वर्षापुर्वी हा रस्ता ज्या परिस्थितीत होता,त्यापेक्षाही या रस्त्यांची दुरुस्ती केव्हा होणार? नविन नाही पण डागडुजीस तरी मुहूर्त मिळणार का? असा प्रश्न लोहारा,सावखेडा येथील शेतकरी वर्गासह नागरिकांना भेडसावत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button