Chalisgaon

दर रविवारी स्वच्छतेसाठी सरसावते तरुणाई… पोलीस ग्राउंड, वेंडर लाईन सह तहसिल व पंचायत समिती आवाराची केली साफसफाई

दर रविवारी स्वच्छतेसाठी सरसावते तरुणाई…

पोलीस ग्राउंड, वेंडर लाईन सह तहसिल व पंचायत समिती आवाराची केली साफसफाई

सौ. प्रतिभा चव्हाण यांच्या पुढाकाराने आमदार मंगेश चव्हाण मित्र परिवाराचा उपक्रम

मनोज भोसले

रविवार म्हटलं की विद्यार्थी असो की नोकरदार, जवळपास सर्वाना सुट्टी असल्याने निवांत पणे रविवार एन्जॉय करण्याचा बऱ्याच जणांचे नियोजन असत.
मात्र एक टीम याला अपवाद ठरत असून अनेकजण सुस्सेगाद झोपेत असताना दर रविवारी ही टीम *चला एक स्वच्छ, सुंदर व हरित चाळीसगाव साठी खारीचा वाटा उचलूया* हा मंत्र जोपासना करत असते.

आमदार मंगेश चव्हाण मित्र परिवार, चाळीसगाव च्या वतीने नवीन वर्षाच्या निमित्ताने दर रविवारी शहरातील विविध रस्ते व भागांची स्वच्छता करण्याचा संकल्प करण्यात आला होता.
मागील ६ रविवार पासून *स्वच्छ चाळीसगांव अभियान* च्या माध्यमातून हा संकल्प न चुकता पूर्ण केला जात असून यासाठी त्यांना *आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या सौ.प्रतिभा चव्हाण* यांचे सक्रीय प्रोत्साहन मिळत आहे.

दर रविवारी स्वच्छतेसाठी सरसावते तरुणाई... पोलीस ग्राउंड, वेंडर लाईन सह तहसिल व पंचायत समिती आवाराची केली साफसफाईकुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता ही टीम दर रविवारी सकाळी ६ वाजता स्वच्छतेसाठी हजर असते. यासाठी २ दिवस अगोदर सर्व मित्र परिवाराला शहरातील कोणत्या भागात या रविवारी स्वच्छता करायची आहे याची माहिती दिली जाते. त्यानुसार खराटे, पाट्या, फावडे या साहित्याबरोबरच प्रत्येक सदस्याला हातमोजे, तोंडाला मास्क दिले जाते.

*दि.९ फेब्रुवारी २०२० रोजी मित्र परिवाराच्या वतीने पोलीस ग्राउंड, पंचायत समिती व तहसिल आवार, वेंडर लाईन येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी सौ.प्रतिभाताई चव्हाण, सौ.योजनाताई पाटील, सौ.सोनलताई वाघ, सौ.भाग्यश्री ताई, सौ. देवरे ताई, सम्राट सोनवणे,तुषार देसले, अजय अहिरे, राहुल माने, दिपक पवार, बंटी घोरपडे, धिरज पाटील, यश चिंचोले, राज पाटील आदी टीम ने आपले योगदान दिले.

दर रविवारी स्वच्छतेसाठी सरसावते तरुणाई... पोलीस ग्राउंड, वेंडर लाईन सह तहसिल व पंचायत समिती आवाराची केली साफसफाई

तरुणाईच्या उत्साहाला सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न – सौ.प्रतिभा मंगेश चव्हाण

सदर अभियानाबाबत सौ.प्रतिभा मंगेश चव्हाण यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,
भारत हा युवांचा देश म्हणून ओळखला जातो, मात्र या युवाशक्तीला आपल्या गावाचे, आपल्या परिसराचे देणे लागतो याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत घडविण्यासाठी, परिसराच्या स्वच्छतेसाठी केवळ शासकीय यंत्रणेच्या भरवश्यावर न राहता आपली देखील नैतिक जबाबदारी आहे ही भावना मनात ठेवून आम्ही सर्व मित्र परिवाराच्या माध्यमातून दर रविवारी विविध भागात स्वच्छ चाळीसगाव अभियान राबवित असतो. तरुणाईच्या उत्साहाला सकारात्मक दिशा देण्याचा हा प्रयत्न असून पुढील काळात नागरिकांच्या छोट्या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.*

*#Green_city*
*#Clean_city*

*#My_Dream_City_Chalisgaon*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button