Amalner

प्रेरणादायी..!अमळनेरच्या पवनकुमारने रचला इतिहास….जामनेर येथे कुस्तीच्या आखाड्यात विजयी…

प्रेरणादायी..!अमळनेरच्या पवनकुमारने रचला इतिहास….जामनेर येथे कुस्तीच्या आखाड्यात विजयी…जयहिंद व्यायमशाळेचे केले नाव लौकिक

अमळनेर येथील युवक पवनकुमार ने इतिहास रचत जामनेर येथे कुस्ती जिंकली आहे.अमळनेर येथील नगरसेवक प्रताप शिंपी यांचा पवन सुपुत्र असून अमळनेर च्या नावात मानाचा तुरा खोवला आहे.सध्या स्मार्ट फोन,लॅपटॉप, संगणक,आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तरुण पिढी मैदानी खेळ विसरत चालली आहे. मोबाईल मध्ये तासनतास गेम खेळण्याच्या या पिढीत कुस्ती सारखा पारंपरिक खेळ खेळणे आणि जिंकणे हीच मुळात कौतुकास्पद बाब आहे.

हाजी पै आशिक बागवान भुसावळ यांच्या स्मरणार्थ जामनेर शहरात विनाप्रेक्षक कुस्त्यांचे सामने (ठेक्याची कुस्ती) 80 किलो वजन गटात अमळनेर येथील पवनकुमार याने यश मिळवत अमळनेर शहराचे नावलौकीक केले.त्यांचे अभिनंदन नगरसेवक प्रताप शिंपी व अमळनेर शिवसेना तालुका व शहराध्यक्ष व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.तसेच संपूर्ण अमळनेर वासीयांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.विजयी पैलवान पवनकुमार च्या मते ‘कुस्ती ही जिद्द संयम और चिकाटीची कसोटी आहे….योग्य क्षणी योग्य निर्णय योग्य डाव काय असतं हे या पैलवान कडून शिकण्याची गरज आहे…. संयम राखून धीर न गमावता घाबरून न जाता योग्य क्षणाची वाट बघून असा डाव टाकला की त्याचा विजय झाला. त्याने अमळनेर करांचे जाहीर आभार मानले आहेत.

कुस्ती हा राष्ट्रीय पारंपरिक प्राचीन खेळ असून सध्याच्या काळात हा खेळ खूप कमी खेळला जातो. पण पवनकुमार ने एक आदर्श निर्माण करत ग्रामीण भागातून देखील उत्तम खेळाडू निर्माण होऊ शकतात फक्त पाहिजे ती जिद्द आणि चिकाटी..पवनकुमार च्या पावलावर पाऊल ठेवून निश्चितच तरुण पिढी या खेळात उतरेल यात शंका नाही.

संबंधित लेख

Back to top button