Nashik

भारतीय टेड युनियन सी आय टी यु संलग्न जनरल कौन्सिल पदाधिकारी बैठक उत्साहात संपन्न

भारतीय टेड युनियन सी आय टी यु संलग्न जनरल कौन्सिल पदाधिकारी बैठक उत्साहात संपन्न.

नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक=भारतीय टेड ही आय टु युनियन संलग्न जनरल कौन्सिल पदाधिकारी यांची आज दिनांक 15 जानेवारी रोजी सिटु कामगार भवन खुटवडनगर येथे सिटू संलग्न सर्व पदाधिकारी व जनरल कौन्सिल सभासद यांची मीटिंग घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदाची सुचना कॉम्रेड तुकाराम सोनजे यांनी मांडली व कॉ.सतीश खैरनार यांनी त्या सूचनेला अनुमोदन दिले.
या मिटिंगच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड सिताराम ठोंबरे तसेच प्रमुख वक्ते म्हणून माजी आमदार कॉम्रेड जे.पी.गावित व सिटु राज्य सचिव कॉम्रेड डॉ.विवेक मॉटेरो हे उपस्थित होते.
या मिटिंग मध्ये मोदी सरकारने बनवलेली कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा , पेट्रोल,डिझेल,गॅसची दरवाढ व महागाई कमी करा यासाठी 23 व 24 फेब्रुवारीला भारत बंदची हाक देण्यात आली तर यासंदर्भात तयारी बद्दल चर्चा करण्यात आली.
या मिटिंग मध्ये कॉम्रेड जे.पी.गावित,कॉम्रेड विवेक मॉंटेरो,कॉम्रेड भिवाजी भावले ,कॉम्रेड तुकाराम सोनजे, कॉम्रेड देविदास आडोळे, कॉम्रेड कल्पनाताई शिंदे,कॉम्रेड विजय विसे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच कामगार प्रतिनिधी म्हणून कॉम्रेड बंडु बागुल, कॉ. निलेश मगर, कॉ. विजय जाधव, कॉ. विनोद बाविस्कर ,कॉम्रेड नंदू सूर्यवंशी,कॉम्रेड नवनाथ शेळके,कॉम्रेड दीपक कोर, कॉम्रेड राजू चौधरी कॉ. मनोज पाटील,कॉ.संजय वाढविंदे, कॉ. सुनिल लाटे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले भारत बंद कशा प्रकारे करायचा याचा सुचना मांडल्या,व भारत बंद चांगल्या प्रकारे यशस्वी करण्याचा निश्चय करण्यात आला.
अध्यक्षीय भाषण कॉ. सिताराम ठोंबरे यांनी करुन मोलाचे मार्गदर्शन केले भारत बंद चांगल्या प्रकारे यशस्वी करण्याचे आव्हान ठोंबरे यांनी केले
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कॉम्रेड आत्माराम डावरे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button