Bollywood

Bollywood: आणि चांदनी… श्रीदेवी आली परत.. की तिची बहीण..!

Bollywood: आणि चांदनी… श्रीदेवी आली परत.. की तिची बहीण..! सगळ्यांनाच बसला शॉक..!

बॉलिवूड 90च्या दशकात सेलिब्रेटी मॅगझीनच पिक आलं होतं. 1990मध्ये एका मॅगझीनमध्ये एका मुलीचा फोटो कव्हर पेजवर छापून आला होता. ज्यावर लिहिलं होतं की “मी श्रीदेवीची अनोळखी बहिण आहे”. कव्हर पेजला असेलल्या मुलीचा चेहरा देखील श्रीदेवीशी मिळता जुळता होता. त्या मुलीचं नाव ‘प्रभादेवी’ होतं. तिचं नाव देखील मॅगझीनवर छापण्यात आलं हतं. 1 एप्रिलला हे मॅगझीन बाजारात आलं. मॅगझीनच्या कव्हर पेजवरील फोटो पाहून बॉलिवूडमध्ये चांगलाच हंगामा झाला होता. कारण श्रीदेवीला बहिण आहे याचा अंदाज कोणालाच नव्हता. आता ती कशी दिसते हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते.

त्या मॅगझीनच्या सगळ्या कॉपी फक्त श्रीदेवीच्या बहिणीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या. पण लोकांना जेव्हा खरं कळलं तेव्हा मात्र एकच हशा पिकला होता. कारण हा एक प्रँक होता. एप्रिल फुल करण्यासाठी आखलेला आणि सक्सेस झालेला प्लान होता. त्या मॅगझीनच्या कव्हर पेजवर असलेली श्रीदेवीची जुळी बहिण दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेते अनुपम खेर होते. त्यांनी मुद्दाम जाणून बुजून बॉलिवूडला एप्रिल फुल करण्यासाठी मॅगझीनबरोबर टायअप करून हा प्रँक केला होता. आधी लोकांना यागोष्टीचं खरं वाटत नव्हतं. पण या फोटोत दिसत असलेली मुलगी स्वत: अनुपम खेर आहेत.
मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी अनुपम खेर यांनी श्रीदेवीचा संपूर्ण गेटअप केला होता. अनुपम श्रीदेवीसारखे दिसावे यासाठी मेकअप आर्टिस्ट आणि स्टायलिस्ट मिक्की कॉन्ट्रॅक्टरनं खूप मेहनत घेतली होती. श्रीदेवीच्या वेशातील अनुपम खेर यांचा फोटो फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी क्लिक होता. लोकांना अनुपम खेर यांच्या या लुकला खूप प्रसिद्धी दिली होती. एखाद्या ग्लॅमरस अभिनेत्रीप्रमाणे अनुपम खेर यांनी पोझेस दिल्या होत्या.
अनुपम खेर यांनी जवळपास 32 वर्षांनी या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर 1991वर हा जुना फोटो शेअर केला होता. एका फोटोनं एका रात्रीत सगळ्यांना कसं खडबडून जागं केलं होतं हे देखील सांगितलं. अनुपम खेर यांनी लिहिलं, “सिनेब्लिट्स मॅगझीनच्या कव्हर पेजवर असलेली मुलगी मी आहे. 1991चा हा एप्रिल फुल इशू होता. या फोटोनं बॉलिवूडमध्ये खळबळ माजवली होती. मिकी कॉन्ट्रॅक्टरने माझा मेकअप केला होता आणि फोटोग्राफर गौतम राजाध्यक्षनं माझा फोटो काढला होता. ते सोनेरी दिवस होते”.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button