Indapur

इंदापूर तालुक्यात आढळले दोन कोरोनाचे रूग्ण…

इंदापूर तालुक्यात आढळले दोन कोरोनाचे रूग्ण…

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे :ग्रीन झोन वावरत असणाऱ्या इंदापूर तालुक्यात आज दोन नवीन कोरोना रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.हे दोन्ही रूग्ण मुंबई येथून इंदापूर तालुक्यातील आपल्या मुळ गावी परतले होते. यांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त होईपर्यंत इंदापूर करांचा जीव टांगणीला लागला होता. आणि अखेर रेडझोन मधून आपल्या मुळ गांवी परतलेल्या एकूण पाच संशयीतांपैकी दोन रुग्णांचे स्वॅब कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत
शनिवार दि.१६ मे रोजी रात्री यांचे अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाले.इंदापूर मध्ये आढळून आलेले हे दोन्ही रुग्ण एकाच कुटुंबातील असून यामध्ये एका महीला आई (वय ३५ वर्ष) आणि मुलगी (वय ११ वर्ष) यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश मोरे यांनी दिली.

दि.१४ मे रोजी इंदापूर तालुक्यातील शिरसोडी येथील एकाच कुटूंबातील चार तर दि.१५ मे रोजी इंदापूर शहरातील एक असे पाच संशयीत रूग्ण आढळून आले.पाच ही संशियीत रूग्णांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले अहे. यातील चार रुग्ण मुंबई शहरातुन इंदापूर तालुक्यातील आपल्या मुळगावी परतले होते. या रुग्णांच्या मुंबई येथील घरातचं कोरोनाचे पेशंन्ट आढळल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतच दाखल केले असल्याची माहिती मिळाली होती.

या कारणास्तव मुंबई हून इंदापूर मध्ये दाखल झालेल्या या चार व्यक्ती व पुणे येथून दाखल झालेली एक व्यक्ती अशा पाचही व्यक्तींना इंदापूर शहरतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात आयसोलेशन मध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. यापैकी चार व्यक्तींचे स्त्रवाचे नुमणे इंदापूर प्रशासनकडून गुरुवारी रात्रीच घेण्यात आले असून पुणे येथे चाचणी साठी पाठवण्यात आला होता. त्यापैकी मुंबईहून परतलेल्या एकाच कुटुंबातील दोन रुग्णांचा अहवाल पाॅझिडीव्ह आला आहे.

या रुग्णांवर इंदापूर मध्येच उपचार केले जाणार असून या रुग्णांच्या संपर्कात कोण कोण आले आहेत याची चौकशी आता इंदापूर प्रशासन करणार असून संपर्कात आलेल्या सर्वांना स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवणार असल्याचेही तालुका अधिक्षक डाॅ.राजेश मोरे यांनी सांगितले आहे.

इंदापूर तालुक्यात बारा हजार स्थलांतरित नागरिक आले आहेत. पासेस मिळाल्यामुळे दररोज दोनशे ते तीनशे नागरिकांची यात भर पडत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button