Amalner

Amalner: संभाजी ब्रिगेड व लायन्स क्लबचा उपक्रमात गणेश शिंगारे पती पत्नी चा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प…

Amalner: संभाजी ब्रिगेड व लायन्स क्लबचा उपक्रम… गणेश शिंगारे पती पत्नी चा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प…

अमळनेर एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्त्व त्याच्या डोळ्यात दिसत असतं, शरीराचं प्रत्येक अवयव महत्वाचे आहे, मात्र डोळ्यांचं महत्व अनन्यसाधारण आहे.अंघ लोकांच्या विचारासाठी आज आपण एकत्र आलो, डोळ्यात फुल पडून अंध
झालेल्या लोकांना जग दिसावे म्हणून मरणोत्तर नेत्रदान करावे, असे प्रतिपादन
डॉ. राहुल मुठे यांनी केले.

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड व
लायन्स क्लब अमळनेर यांच्या वतीने नेत्रदान राजासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अमळनेर न प चे जल व्यवस्थपन कर्मचारी श्री गणेश शिंगारे व त्यांची पत्नीकिरण गणेश शिंगारे यांनी मरणोत्तर नेत्रदान केले. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button