Maharashtra

देशातील सर्वोत्कृष्ट दहा जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीत महाराष्ट्राच्या मराठीमोळ्या रोहिणी भाजीभाकरे

देशातील सर्वोत्कृष्ट दहा जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीत महाराष्ट्राच्या मराठीमोळ्या रोहिणी भाजीभाकरे

सुभाष भोसले -कोल्हापूर
तमिळनाडू राज्यातील सेलमच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणुन कर्तव्य बजावलेल्या सोलापूरच्या कन्या रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांची भारत सरकारच्या नवी दिल्ली येथे उच्च शिक्षण विभागाच्या उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रोहिणी भाजीभाकरे-बिदरी या २००८ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ११८ व्या क्रमांकाने आयएएस म्हणून उत्तीर्ण झाल्या होत्या.

प्रशिक्षणानंतर त्यांची नियुक्ती तामिळनाडू केडरमध्ये करण्यात आली. रोहिणी भाजीभाकरे यांनी मदुराई जिल्ह्याच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तसेच अप्पर जिल्हाधिकारी वतिरूमेलवेलीच्या उपजिल्हाधिकारी म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. आरोग्य आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवरचा ‘भाजीभाकरे’ पॅटर्न तामिळनाडू राज्यात प्रसिध्द झाला होता. त्यांच्या या कार्याची दखल घेत तामिळनाडू राज्यात मदुराई येथे कार्यरत असताना भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेत उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते मनरेगा’ या राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.

तसेच द बेटर इंडिया या वेबसाईटने जाहिर केलेल्या सर्वात्कृष्ट दहा जिल्हाधिकार्यांमध्ये देखील त्यांची निवड झाली होती. त्यांची प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तमिळनाडू सरकारने त्यांना सेलम जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. नुकतीच त्यांची भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या उपसचिवपदी नियुक्ती करण्यात. आयआयटी, आयआयएम, एम्स, एनसीईआरटि, सीबीएसई, आयसीएसई, युजीसी व इतर प्रमुख प्रमुख संस्था या खात्याअंतर्गत येतात.त्यांना शैक्षणिक क्षेत्राविषयी आवड असून आतंरराष्ट्रीय दर्जाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धती भारतात विकसित करणेसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button