Chimur

खंडसगीमध्ये देशी दारू दुकानात नियम ढाब्यावर बसवून होते दैनंदिन अवैधरित्या दारूची विक्री प्रिंट रेट पेक्षा अधिक किंमतीने विकल्या जाते देशी दारू उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

खंडसगीमध्ये देशी दारू दुकानात नियम ढाब्यावर बसवून होते दैनंदिन अवैधरित्या दारूची विक्री
प्रिंट रेट पेक्षा अधिक किंमतीने विकल्या जाते देशी दारू
उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष

चिमूर ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर : – खंडसगी येथील देशी दारू दुकानात नियम धाब्यावर बसवून दारूची विक्री होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत असून उत्पादन शुल्क विभागाचे याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
उत्पादन शुल्क विभागाची डोळेझाक हि होत आहे म्हणजे खंडसगी येथे असलेले देशी दारू दुकान हे किरकोळ विक्रीसाठी असतांना येथून सर्रास ठोक होलसेलरीत्या विविध ठिकाणी जवळच्या लहान गावात दारुची मोठ्या प्रमाणावर अवैध विक्री होतांना दैनंदिन खुलेआम दिसून येने.या दुकानास किरकोळ विक्री परवाना असताना होलसेल विक्री कशी का होते ? असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची या प्रकाराकडे सर्रास डोळेझाक होत आहे. देशी दारू विक्री दुकानास सकाळी दुकान उघडणे व बंद करण्याची नियमावली आहे मात्र असे असतानाही या नियमांना केराची टोपली दाखविली जात असल्याचा आरोप सुद्धा स्थानिक नागरिक करीत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या देशी भट्टीतील मालाची तपासणी करून दैनंदिन विकत घेतलेल्या मालाची आणि दैनंदिन विक्री केलेल्या मालाची तपासणी करून दैनंदिन किती रुपयांची दारू विक्री केली जाते याची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहे.तसेच याअगोदर बघायचे म्हटले तर चंद्रपूर जिल्हा १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी जिल्हा म्हणून महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध झाला होता.याचे कारण म्हणजे श्रमिक एल्गार संघटना जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलन पदयात्रा , मुंडन अशा विविध प्रकारच्या आंदोलनाणे अखेर चंद्रपूर जिल्हा दारु बंदी झाली.तेव्हा केंद्रात आणि राज्यात भाजप ची सरकार होती.आणि दारूबंदी उठविण्यात आली तेव्हा महाविकास आघाडी सरकारने दारु बंदी उठविण्यात यश मिळवले.परंतु चंद्रपूर जिल्हा हा संतांचा जिल्हा म्हणून जगप्रसिद्ध आहे.आणि याठिकाणी दारूबंदी नाही.आज वर्धा असो अथवा गडचिरोली यांचे उदाहरण बघावे तेवढे कमी आहे.म्हणून उत्पादन शुल्क विभागाने चंद्रपूर जिल्ह्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात प्रिंट रेट पेक्षा अधिक किंमतीने देशी दारू विकल्या जात आहे प्रिंट रेट 70रुपये असून 80रुपया सरास विक्री केल्या जात आहे या कडे राज्य उत्पादन शुलकाने लक्ष देणे गरजेचं आहे वाईन शॉप बियर शॉपी देशी दारू दुकानात प्रिंट रेट पेक्षा जास्त किंमतीने विकणे कायद्याने गुन्हा असून यावर जिल्हाधिकारी कारवाही करतील काय? अस प्रश्नच निर्माण होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button