Ahamdanagar

मोहोजफाटा येथील अपघातात पती ठार पत्नी गंभीर जखमी, पंढरीची वारी, राहीली अधुरी!

मोहोजफाटा येथील अपघातात पती ठार पत्नी गंभीर जखमी, पंढरीची वारी, राहीली अधुरी!

सुनिल नजन/अहमदनगर

पंढरपूरला जायचे आहे म्हणून सासरवाडी हुन धोंडे खाउन बायकोला घेऊन निघालेल्या लाडाच्या जावयावर स्वर्गात जाण्यासाठी आली म्रुत्युची बारी,आणि पंढरीची वारी, राहीली अधुरी . . ! अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथील वारकरी ज्ञानेश्वर काशिनाथ दगडखैर वय(३९) हा आपली पत्नी सौ. वंदना ज्ञानेश्वर दगडखैर वय(३५)हीला आपली सासरवाडी कोल्हार(कोल्हुबाईचे) तालुका पाथर्डी येथून मोटारसायकल क्र.MH16 CR 4934 वर बसून घेऊन आपल्या गावी हनुमान टाकळी कडे जात होता. मोटारसायकल मोहोजफाटा येथील चौकात येताच मीरी कडून तिसगाव च्या दिशेने आठरा प्रवासी घेऊन जाणाऱ्या ट्रँव्हल क्र.MH 23 E 8293 ने जोरदार धडक देऊन या पती पत्नीला मोटारसायकल सह अंदाजे शंभर फुट दुरवर फरपटत नेउन नेल्यामुळे मोटारसायकल स्वार ज्ञानेश्वर दगडखैर आणि त्याची पत्नी वंदना ज्ञानेश्वर दगडखैर यांना जोरदार मार लागला. वंदना दगडखैर हीचे मांडीचे हाड फँक्चर होउन शरीरातील अनेक भागास मुका मार बसला तर ज्ञानेश्वर दगडखैर याचे डोके ट्रँव्हल गाडीच्या काचावर आदळून जोरदार मार लागताच तो जागेवरच बेशुध्द आवस्थेत पडून होता. अचानक झालेल्या अपघातामुळे वंदनालाही काहीच सांगता येत नव्हते. आणि निट उठता बसताही येत नव्हते.तीच्या पर्समध्ये असलेल्या आधार कार्डवरून तीची ओळख पटली. परीसरात असलेल्या हाँटेल व्यावसायिकांनी सरकारी अँम्बुलंन्सला फोन केला पण ती वेळेवर उपलब्ध न झाल्या मुळे तिसगाव येथील डॉ. चितळे यांच्या खाजगी अँम्बुलंन्सला पाचारण करून जखमींना तिसगाव येथील खाजगी दवाखान्यात नेन्यात आले. ट्रँव्हल गाडीचा चालक उमेश कोठावते रा.ओझर जिल्हा नाशिक हा ही जखमी सोबतच होता.मीरी रोडवरील डॉ.चितळे यांनी जखमींना तात्काळ अहमदनगर येथील सरकारी दवाखान्यात हलविण्याचे सांगितले अहमदनगरला पोहोचन्या अगोदरच ज्ञानेश्वर दगडखैर याचा वाटेतच म्रुत्यु झाला.मग ट्रँव्हल चालक उमेश कोठावते याला गाडीखाली उतरून देऊन पाथर्डी पोलीस स्टेशनला हजर होण्यास सांगितले होते.श्रीमती वंदना दगडखैर यांना साईदीप हाँस्पिटलला पुढील उपचारासाठी दाखल केले. आणि ज्ञानेश्वर दगडखैर याचा देह पुढील उत्तरीय तपासणी साठी सरकारी दवाखान्यात नेण्यात आला.उत्तरीय तपासणी नंतर ज्ञानेश्वर दगडखैर यांच्या वर मोठ्या शोकाकुल वातावरणात हनुमान टाकळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी साडेचार वाजता पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल कानडे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघात स्थळावरील अपघात ग्रस्त ट्रँव्हल पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये हजर केली तर मोटारसायकल शेजारच्या हाँटेलवर नेउन लावली. पो.काँ. कानडे यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनला आकस्मिक म्रुत्यु रजिस्टर नंबर 105/2023 कलम 174 नुसार नोंद केली आहे.पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.रस्त्यावर लावलेले फलक असे सांगतात की “अती घाई, म्रुत्युला आमंत्रण देई ” ते वाक्य येथे तंतोतंत खरे ठरले आहे. ज्ञानेश्वर दगडखैर याला अचानक स्वर्गातील ईहलोकीच्या वारीला जाताना त्याची ठरवलेली पंढरीची वारी मात्र अधुरी राहिली.ज्ञानेश्वर हा अपघातात जखमी झालेला होता तरीही शुद्धीवर असताना मला पंढरपूरला जायचे आहे असे सारखे म्हणत असतानाच बेशुद्ध पडला. दगडखैर परीवारावर दुख्खाचा डोंगर कोसळला आहे. ह.भ.प. काशिनाथ उर्फ हरिश्चंद्र दगडखैर महाराज यांचा ज्ञानेश्वर हा मुलगा होता तर वंदना ही सुनबाई होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button